BREAKING : परिवहन मंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानी ईडीची छापेमारी

सात ठिकाणी ईडीकडून धाडसत्र सुरू केलं आहे.आज सकाळी सहा वाजता ईडीचं पथक त्यांच्या घरी पोहचले आहे.
Anil Parab ED Raid news
Anil Parab ED Raid news sarkarnama

मुंबई : राज्याचे परिवहनमंत्री,शिवसेनेचे नेते अनिल परब (Anil Parab)यांच्या शासकीय निवासस्थानावर ईडीनं आज सकाळ छापेमारी केली. अनिल परब यांच्या संबंधित अशा एकूण सात ठिकाणी ईडीकडून धाडसत्र सुरू केलं आहे.आज सकाळी सहा वाजता ईडीचं पथक त्यांच्या घरी पोहचले आहे. (Anil Parab ED Raid news update)

महाविकास आघाडी सरकारमधील नेते अनिल देशमुख, नवाब मलिक, यांच्यानंतर ईडीनं महाविकास आघाडीतील महत्वाचे मंत्री असलेले अनिल परब यांच्यावर छापेमारी केल्यानं राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

याआधी अनिल परब यांच्या सीएच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केली होती. अनेक ठिकाणी आयकर विभागाने छापेमारी केली होती. अनिल परब यांचे सीए आता आयकरच्या रडारवर होते. आता ईडीकडून झाडाझडती सुरु झाली आहे.

Anil Parab ED Raid news
पूजा सिंघल यांचा मुक्काम आता रांचीच्या होटवार कारागृहात

अनिल परब यांचे शासकीय निवास्थान शिवालय आणि वांद्रेतील खासगी निवासस्थानासह त्यांच्याशी संबंधित सात ठिकाणांवर आज सकाळी ईडीने छापेमारी सुरु केली आहे.

अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी ईडीकडून छापेमारी सुरु आहे. तसेच वांद्रे येथील त्यांच्या निवासस्थानीही ईडीकडून छापेमारी सुरू करण्यात आली असल्याच्या बातम्या समोर येत आहे. "अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यानंतर अनिल देशमुख यांनी आता कपड्याच्या बॅग तयार ठेवा," असे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी या कारवाईनंतर माध्यमांना सांगितले.

Anil Parab ED Raid news
'एकदा आमची पण गरीबी हटू द्या' ; सदाभाऊ खोतांची ठाकरे सरकारकडे अजब मागणी

शिवालय येथील अंजिक्यतारा या परब यांच्या शासकीय निवासस्थानाजवळ मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात आहेत. अनिल परब सध्या कुठे आहेत, याबाबत अजून माहिती स्पष्ट झालेली नाही.

बेनामी मालमत्ता, मनी लाँन्ड्रिंग, शेल कंपन्या याबाबत ठाकरे सरकारच्या घोटाळेबाजांवर कठोर कारवाईची होईल ही अपेक्षा आहे. यशवंत जाधव, हसन मुश्रीफ यांचीही ईडीनं चौकशी करावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.

काल पालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना देखील ईडीने समन्स बजावला आहे. यापूर्वी त्यांच्यावर आयकर विभागाने धाड टाकली होती.

काही महिन्यांपूर्वी अनिल परब यांची ईडी चौकशी झाली होती. त्यांच्याविरूद्ध किरिट सौमय्या यांनी दापोली मध्ये अनधिकृतपणे रिसोर्ट बांधल्याचा दावा केला आहे. आज त्यांच्या घरी ईडीच्या अधिकार्‍यांनी धाड टाकली आहे, त्यामध्ये त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिस बदल्यांमध्ये आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या प्रकरणात अनिल परबांचाही हात असल्याची चर्चा होती, यावरुन चौकशी सुरु असल्याचे सुत्रांनी सांगितले.

  • अनिल परब हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात.

  • अ‍ॅडव्हकेट असलेल्या अनिल परबांकडे आगामी बीएमसी निवडणूकींच्या दृष्टीने मोठी जबाबदारी पक्षाकडून देण्यात आली आहे.

  • ईडी कारवाई होणं हे शिवसेनेसाठी मोठं नुकसानकारक आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com