ज्याने मंदिर तोडलं, त्याला तोडण्याची वेळ आलीय ; भाजप आमदाराचं वादग्रस्त विधान

“कल्याण परिसरातील मोहने येथे एका मंदिरावर विना परवानगी ज्या अधिकाऱ्याने कारवाई केली. त्याला तोडायची वेळ आली आहे,” असे वादग्रस्त विधान आमदार रमेश पाटील ( bjp mla ramesh patil) यांनी केले आहे.
ज्याने मंदिर तोडलं, त्याला तोडण्याची वेळ आलीय ; भाजप आमदाराचं वादग्रस्त विधान
mla ramesh patil)sarkarnama

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील मच्छीविक्रेत्यांना केडीएमसीकडून परवाना वितरण करण्यास सुरुवात केली आहे . गुरूवारी मच्छीविक्रेता  परवाना वितरण कार्यक्रम भाजपच्या वतीने कल्याणतील दामोदर हॉल मध्ये आयोजित करण्यात आला होता .या कार्यक्रमासाठी मच्छी विक्रेत्यांनी गर्दी गेली होती. या कार्यक्रमात विधानपरिषदेचे आमदार व कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेश पाटील ,आमदार रवींद्र चव्हाण उपस्थित होते. यावेळी केलेल्या विधानामुळे भाजपचे आमदार रमेश पाटील ( bjp mla ramesh patil) हे अडचणीत आले आहेत

“कल्याण परिसरातील मोहने येथे एका मंदिरावर विना परवानगी ज्या अधिकाऱ्याने कारवाई केली. त्याला तोडायची वेळ आली आहे,” असे वादग्रस्त विधान आमदार रमेश पाटील ( bjp mla ramesh patil) यांनी केले आहे. त्यांच्या या विधानानंतर आता कल्याणमध्ये वेगळा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्याला शिक्षा झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. या संदर्भात आयुक्तांना आम्ही भेटणार आहोत असे पाटील म्हणाले. विशेष म्हणजे पाटील यांनी कल्याण बंद करण्याचा इशारा दिला आहे.

''आमच्या ग्रामदेवतेचे मंदिर विनापरवानगी न घेता त्यांनी तोडलं आहे. सगळ्यांनी एकत्र व्हा. आपल्याला त्या मंदिराला संरक्षण द्यायचं आहे. आमचं मंदिर परत बांधून द्या, आणि ज्यांनी ते तोडलं आहे. त्याला तुरुगांत टाका,'' असे आमदार पाटील म्हणाले.

आमदार चव्हाण व आमदार पाटील या दोन्ही नेत्यांनी ''आम्ही मच्छी विक्रेत्यांच्या पाठीशी असल्याचं यावेळी सांगितलं .यावेळी आमदार पाटील यांनी कल्याण मोहने येथिल मंदिरावर केडीएमसी ने  कारवाई केली यामुळे जो वाद झाला त्याबाबत बोलताना ''ज्यानी विनापरवानगी मंदिर तोडलं त्याला तोडण्याची वेळ आता आलीय , पुढील दोन दिवसात सर्वांनी एकत्र येऊन कल्याण बंद करायचं आहे,'' अस वादग्रस्त विधान केलं . कार्यक्रमानंतर आमदार पाटील यांनी मंदिरावर कारवाई अधिकाऱ्याला शिक्षा झाली पाहिजे अशी आमची मागणी असून याबाबत पालिका आयुक्तांना भेटणार असल्याचे सांगितले .

 mla ramesh patil)
परमबीर सिंहांना शिक्षा होणारच ; सरकार न्यायालयीन लढाई लढणार

मोहने परिसरात 17 नोव्हेंबर रोजी कल्याण पश्चिम येथे एका बांधकामावर कारवाई करण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेचे प्रभागअधिकारी राजेश सावंत पोहोचले होते. त्यांनी कारवाई सुरु करण्याआधीच स्थानिक गावकऱ्यांनी विरोध दर्शविला होता. तरीदेखील महापालिकेच्या पथकाने या बांधकामावर कारवाई केली होती. कारवाई करुन महापालिकेचे अधिकारी सावंत प्रभाग कार्यालयात परतले होते. या दरम्यान माजी नगरसेवक मुकुंद कोट आणि स्थानिक नागरिक कार्यालयात पोहोचले होते. यादरम्यान सावंत आणि कर्मचाऱ्यांसमोर कोट समर्थकांनी गोंधळ घातला होता. हा वाद नंतर विकोपाला गेल्यामुळे मुकुंद कोट यांनी सावंत यांच्या कानशिलात लगावली होती.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in