Shivsena Bhavan : बॉम्बस्फोट ते पक्षातील फूट... ; अनेक धक्क्यांचं साक्षीदार आहे 'शिवसेना भवन', एकदा वाचाच...

शिवसेना भवन राज्यभरातील शिवसैनिकांचे श्रद्धास्थान मानले जाते.
Shivsena Bhavan :
Shivsena Bhavan : Sarkarnama

Shivsena Bhavan : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे शिंदे गटाला दिल्यापासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तपले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर ठाकरे गटाने या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय़ घेतला आहे.

पण दुसरीकडे आयोगाच्या निर्णयानंतर आता शिवसेना भवन, शिवसेनेच्या शाखा कोणाच्या ताब्यात जाणार असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. खरतंर शिवसेना भवन राज्यभरातील शिवसैनिकांचे श्रद्धास्थान मानले जाते. शिवसेना भवन हे भुतकाळातील अनेक महत्त्वाच्या घटनांचे साक्षीदार राहिले आहे. हे शिवसेना भवन कधी आणि कसे उभारले गेले याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत

शिवसेनेची इमारत कधी बांधली?

मुंबईतील सर्वात गजबजलेल्या दादरमध्ये 1974 साली शिवसेना भवनाची स्थापना करण्यात आली. बाळासाहेब ठाकरे यांनी या शिवसेना भवनाची स्थापना केली होती. जून 1966 मध्ये शिवसेना पक्षाची स्थापना झाल्यानंतर आठ वर्षांनी शिवसेना भवनाची स्थापना झाली.

शिवसैनिकांमध्ये शिवसेना भवनाची स्वतःची अशी एक प्रतिष्ठा आहे. शिवसैनिक आजही या भवनाला मंदिराचा दर्जा देतात. पक्ष स्थापन झाला तेव्हा काही काळ बाळासाहेब ठाकरे यांच्या घरी ‘मातोश्री’वर पक्षाचे कामकाज चालायचे. पण नंतर ते शिवसेना भवनात होऊ लागले. आजच्या घडीला ही अब्जावधींची मालमत्ता आहे.

Shivsena Bhavan :
By-elections News : ''कसबा अन् चिंचवडच्या पोटनिवडणुकीचा निकाल अमित शाहांनी हेरला;'' म्हणूनच त्यांनी प्रचार...

अद्वितीय वास्तुकला

शिवसेनेचे वर्चस्व वाढल्याने पक्षासाठी पद्धतशीर कार्यालयाची मागणी करण्यात आली. दादरमध्ये एक जागा ठरण्यात आली आणि त्या ठिकाणी शिवसेना भवनाच्या इमारतीची उभारणी करण्यात आली. शिवसेना भवन उभारण्यात आले तेव्हा कार्यकर्त्यांमधील उत्साह पाहण्यासारखा होता. कामगारांनी मोठ्या प्रमाणात देणग्या गोळा केल्या होत्या. या शिवसेना भवनाच्या उभारणीसाठी हजारो छोट्या-मोठ्या कामगारांनी मेहनत घेतली होती.

मुंबईतील काही प्रसिद्ध इमारतींप्रमाणेच शिवसेना भवनही आपल्या अनोख्या वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे. मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स किंवा टाइम्स बिल्डिंगप्रमाणेच शिवसेना भवनाचेही स्वतःचे आकर्षण आहे. याला प्रसिद्ध वास्तुविशारद गोरे यांनी किल्ल्याचे स्वरूप दिले होते. तर सहस्रबुद्धे यांनी येथे शिवाजी महाराजांचा पुतळा बाळासाहेबांच्या देखरेखीखाली बनवला होता.

Shivsena Bhavan :
Amit Shah News : विश्वासघात करणाऱ्यांना कधीही माफी नसते; अमित शाहंनी स्पष्टच सांगितलं..

शिवसैनिकांचे श्रद्धास्थान आणि शक्ती केंद्र

शिवसेना भवन हे महाराष्ट्राच्या राजकारणाचे मुख्य केंद्र व्हायला वेळ लागला नाही. शिवसेना भवनाच्या उभारणीनंतरही अनेक वर्षे पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे 23 जानेवारीला त्यांच्या वाढदिवसानिमित्त येथे उभे राहून कार्यकर्ते आणि नेत्यांच्या भेटीगाठी घेत असत. युतीच्या काळातही याच शिवसेना भवनात भाजप आणि शिवसेनेच्या अनेक राजकीय बैठका झाल्या आहेत.

दहशतवादी हल्ला

शिवसेना भवन हे केवळ मुंबईतील मोठ्या राजकीय उलथापालथींचेच नव्हे तर मोठ्या घटनांचे साक्षीदार राहिले आहे. 1993 मध्ये मुंबईत एका पाठोपाठ 13 बॉम्बस्फोट झाले. ज्यात 251 लोक मृत्यूमुखी पडले तर 750 लोक जखमी झाले. त्यानंतर शिवसेना भवनाजवळही स्फोट झाला. ही इमारत दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याचे स्पष्ट झाले. या हल्ल्यानंतर इमारतीचे मोठे नुकसान झाले. काही वर्षांनी शिवसेनेच्या इमारतीची बरीच डागडुजी करण्यात आली. त्यानंतर जुलै 2007 मध्ये शिवसेनेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन झाले. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी केलेले भाषण आजही शिवसैनिकांच्या लक्षात आहे.

पक्षाचे चिन्हही बदलले

1986 मध्ये मुंबई महापालिका निवडणुकीच्या वेळी शिवसेनेने तलवार आणि ढाल या चिन्हावर निवडणूक लढवली होती. त्यापूर्वी 1978 मध्ये पक्षाने रेल्वे इंजिनच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. 1985 मध्ये पक्षाने टॉर्चपासून बॅट बॉलपर्यंतच्या चिन्हांवर निवडणूकही लढवली आहे. पण 1989 मध्ये पक्षाला धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com