राज कुंद्राच्या अडचणी पुन्हा वाढल्या; उच्च न्यायालयानं दिला मोठा झटका
Raj Kundra and Shilpa Shetty File Photo

राज कुंद्राच्या अडचणी पुन्हा वाढल्या; उच्च न्यायालयानं दिला मोठा झटका

जामीनावर बाहेर असलेल्या कुंद्रावर मुंबई पोलिसांनी गुन्हे शाखेपाठोपाठ सायबर शाखेनेही गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती व उद्योगपती राज कुंद्राच्या (Raj Kundra) अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. जामीनावर बाहेर असलेल्या कुंद्रावर मुंबई पोलिसांनी गुन्हे शाखेपाठोपाठ सायबर शाखेनेही गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने कुंद्राला झटका देत त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्याच्यासह अभिनेत्री शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडे यांना जामीन नाकारण्यात आला आहे.

पॉर्न फिल्म रॅकेट (Porn Film Racket) प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने जुलै महिन्यात कुंद्राल अटक केली होती. मुंबई पोलिसांनी कुंद्रासह चार जणांविरुद्ध तपशीलवार पुरवणी आरोपपत्र दाखल केल्यानंतर सप्टेंबरमध्ये एस्प्लानेड, मुंबई येथील मुख्य महानगर दंडाधिकारी यांनी त्यांला जामीन मंजूर केला. त्यानंतर सायबर पोलिसांनीही कुंद्रासह पांडे व चोप्रा यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 292, 293 (अश्लील सामग्रीची विक्री), माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66E, 67, 67A (लैंगिक सुस्पष्ट सामग्रीचे प्रसारण) आणि महिलांचे अशोभनीय प्रतिनिधित्व (प्रतिबंध) या तरतुदींनुसार स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे.

Raj Kundra and Shilpa Shetty
परमबीरसिंहांच्या जिवाला धोका असल्याचे ऐकून गृहमंत्री वळसे पाटलांना बसला धक्का!

या प्रकरणात अटक टाळण्यासाठी तिघांनीही मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता, बुधवारी हा निकाल राखून ठेवल्यानंतर गुरुवारी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी तिघांनाही जामीन नाकारला. त्यामुळे आता तिघांच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार आहे. जामीनावर बाहेर असलेल्या कुंद्रा अडचणी आणखी वाढल्या आहेत. त्याच्यासह शिल्ला शेट्टी फसवणुकीच्या प्रकरणातही गुन्हा दाखल आहे.

न्यायालयाने तिघांना चार आठवड्यांच्या अंतरिम सुरक्षा दिली आहे. त्यामुळे पुढील चार आठवडे त्यांना कायदेशीर कारवाईपासून संरक्षण मिळाले आहे. कुंद्रा यांना चुकीच्या पध्दतीने या गुन्ह्यात गोवण्यात आल्याचा दावा त्यांचे वकील प्रशांत पाटील व स्वप्नी अंबिरे यांनी न्यायालयात केला होता. ज्येष्ठ वकिल शिरीष गुप्ते यांनी कुंद्रा यांची बाजू मांडताना कोणताही ठोस पुरावा नसल्याचे सांगितले. हॉटशॉट अॅपबाबत कोणतेही पुरावे नाहीत, असं गुप्ते यांनी सांगितले.

कुंद्रा याला पॉर्न फिल्म रॅकेटप्रकरणी 19 जुलैला अटक झाली होती. या प्रकरणात एकूण 12 आरोपी आहेत. अश्लील चित्रपटांची निर्मिती करुन त्यांचे वितरण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. कुंद्रा याला सुरवातीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. नंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. सध्या तो जामीनावर बाहेर आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार कुंद्रा असल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी कुंद्राकडून 48 टीबी डेटा जप्त केला असून, यात अश्लील फोटो, व्हिडीओंचा समावेश आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in