अखेर आमदार दिलीप लांडेंचीच सरशी; नसीम खान यांना न्यायालयाकडून झटका

दिलीप लांडे यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत खान यांचा पराभव केला आहे.
Dilip Lande, Naseem Khan
Dilip Lande, Naseem KhanSarkarnama

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे (Dilip Lande) यांना मोठा दिलासा दिला आहे. काँग्रेसचे नेते नसीम खान (Naseem Khan) यांनी त्यांच्या निवडीविरोधात दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. लांडे यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) चांदवली मतदारसंघातून खान यांचा अवघ्या 409 मतांच्या फरकांनी पराभव केला होता. या पराभव खान यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता.

लांडे यांच्यावर गंभीर आरोप करत खान यांनी ही निवडणूक रद्द करण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर गुरूवारी न्यायाधीश संदीप शिंदे यांच्यासमोर सुनावणी झाली. खान यांच्याकडून आवश्यक पुरावे सादर न करण्यात आल्याने न्यायाधीश शिंदे यांनी याचिका फेटाळून लावली. लांडे यांनी निवडणूक प्रचारादरम्यान आपल्याविरोधात काही व्हिडीओ व्हॉट्सअॅपवरून जाणीवपूर्वक पसरवले होते. यातून आपण देशविरोधी व्यक्ती असल्याचे चित्र निर्माण करण्यात आल्याचा दावा खान यांनी याचिकेत केला होता.

Dilip Lande, Naseem Khan
मुख्यमंत्री योगी 'खिचडी' खात असतानाच सात माजी आमदारांनी दिला झटका!

शिवसेनाप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी प्रचाराला बंदी असलेल्या कालावधीत मतदारांशी संवाद साधला. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचा भंग झाला होता. व्हॉट्सअॅपवरून पसरवण्यात आलेल्या व्हिडीओमुळे केवळ लांडे यांनाच फायदा होणार होता, असा दावाही खान यांनी याचिकेत केला होता. खान यांच्या या याचिकेनंतर आमदार लांडे यांनी ही याचिका रद्द कऱण्यासाठी अर्ज दाखल केला होता.

Dilip Lande, Naseem Khan
माझा तमाशा केला! तिकीट न मिळाल्यानं पोलीस ठाण्यात धाव घेत नेता ढसाढसा रडला

खान हे व्हॉट्सअॅपवर पसरवण्यात आलेल्या व्हिडीओचा स्त्रोत काय होता, हे सिध्द करू शकले नाहीत. तसेच निवडणूक आचारसंहित आणि लांडे यांच्या विजयाचा संबंधही सिध्द करता आला नाही. याआधारावर न्यायाधीश शिंदे यांनी खान यांची याचिका फेटाळून लावली. अॅड. गिरीश गोडबोले, अमोल कचरिया, वेदांशी शहा आणि बिपीन जोशी यांनी खान यांच्यावतीने न्यायालयात बाजू मांडली. तर अॅड. शार्दुल सिंग, संदेश इनामदार-शिंदे आणि बी. ए. लवाटे यांनी लांडे यांच्याबाजूने युक्तीवाद केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in