...तोपर्यंत त्यांना काय म्हणायचंय ते म्हणू द्या! 'दिलासा घोटाळ्या'वरून उच्च न्यायालयानं सुनावलं

विशिष्ट पक्षाच्या लोकांनाच अटकेपासून संरक्षण मिळतंय. महाविकास आघाडीच्या नेत्यांना जामीन का मिळत नाही, असा सवाल संजय राऊत यांच्याकडून सतत केला जातो.
...तोपर्यंत त्यांना काय म्हणायचंय ते म्हणू द्या! 'दिलासा घोटाळ्या'वरून उच्च न्यायालयानं सुनावलं
Mumbai High CourtSarkarnama

मुंबई : ''न्यायव्यवस्थेत विशिष्ट विचारसरणीचे लोक आहेत, विशिष्ट पक्षाच्या लोकांनाच अटकेपासून संरक्षण मिळतंय. महाविकास आघाडीच्या नेत्यांना जामीन का मिळत नाही, असा सवाल शिवसेनेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याकडून सतत केला जातो. हा दिलासा घोटाळा असल्याची टीकाही राऊतांनी केली आहे. त्याविरोधात भारतीय बार असोसिएशनने (Indian Bar Association) मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या अवमान याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली.

मुंबई उच्च न्यायालयाचे (Mumbai High Court) मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता आणि न्यायाधीश व्ही. जी. बिश्त यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. याचिकेमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), संजय राऊत, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) आणि विवेक कडा यांच्याविरोधात अवमान याचिका दाखल करून घेण्याची विनंती करण्यात आली आहे. या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे ठाकरेंसह राऊत व वळसे पाटील यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

Mumbai High Court
पंतप्रधानांच्या बैठकीनंतर काही तासांतच मास्क सक्तीबाबत राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य

उच्च न्यायालयाच्या न्यायमुर्तींविरोधात खोटे, (प्रतिष्ठेला) कलंक लावणारे आणि अवमानजनक आरोप केल्याप्रकरणी ही याचिका दाखल केली आहे. यावर सुनावणी करताना न्यायालयाकडून उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर जूनमध्ये त्यावर सुनावणी घेण्यात येईल, असं सांगितलं. पण यावेळी न्यायालयाने स्पष्ट शब्दांत संबंधितांना सुनावलं. 'न्यायव्यवस्थेबाबत त्यांना काय म्हणायचे आहे ते म्हणू द्या. अशी टीकांसाठी आमचे खांदे भक्कम आहे. जोपर्यंत आमचा विवेक शाबुत आहे, तोपर्यंत त्यांना काहीही म्हणू द्या,' असं मत न्यायालयाने नोंदवलं आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत?

न्यायव्यवस्थेवर कोणाचा दबाव आहे का? न्यायव्यवस्थेमध्ये विशेष अशी लोक बसवण्यात आलेली आहेत का? दिलासे देण्यासाठी ते कोणाच्या सूचनेनुसार काम करतायत का, असे प्रश्न राऊत यांनी उपस्थित केले होते. हे असंच सुरु राहिलं तर या देशाचं स्वातंत्र्य, लोकशाही आणि न्यायव्यवस्था धोक्यात येईल, असंही राऊत म्हणाले होते.

Mumbai High Court
नवनीत राणांची थेट दिल्लीच्या पोलीस आयुक्तांकडं धाव; राऊतांना आणणार अडचणीत

भाजपचे नेत किरीट सोमय्या, नारायण राणे, नितेश राणे, प्रविण दरेकर, अनिल बोंडे आदींना त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यावरुन न्यायालयाने जामिन देत त्यांना दिलासा दिला आहे. त्यावर राऊतांनी न्यायव्यवस्थेवर संशय व्यक्त करुन गंभीर आरोप केले. न्यायव्यवस्थेचा तराजू हा भंगारमधून घेतला असल्याची टीकाही राऊतांनी केली होती. न्यायालयकडून केवळ किरीट सोमय्या आणि भाजप नेत्यांनाच दिलासा देऊन पक्षपातीपणा केला जात असल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. संजय राऊत यांच्या म्हणण्यानुसार न्यायालये एकीकडे भाजपशी संबंधित लोकांना दिलासा देत आहेत पण शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाशी संबंधित आरोपींना दिलासा देत नाहीत, असं राऊत म्हणाले होते.

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख या तुरुंगात बंद असलेल्या मंत्र्यांना न्यायालयाने कोणताही दिलासा न दिल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. किरीट सोमय्यांवर आयएनएस विक्रांत गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सोमय्यांना दिलासा मिळाल्यानंतर तुम्ही “दिलासा घोटाळा आहे” असं टि्वट केल्याचा संदर्भ देत राऊतांनी प्रश्न उपस्थित केला होता. “मी १०० टक्के सांगतो हा दिलासा घोटाळाच आहे.तो विशिष्ट राजकीय पक्षाच्या आणि विशिष्ट विचारांच्या लोकांनाच मिळावा यासाठी न्याययंत्रणेमध्ये एक व्यवस्था काम करतेय,” असं उत्तर राऊतांनी दिलं होतं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.