Covishield : अदर पुनावालांसह बिल गेट्स यांना मुंबई उच्च न्यायालयाची नोटीस, काय आहे प्रकरण, जाणून घ्या !

Covishield : याचिकाकर्ते दिलीप लुणावत यांनी मुलीच्या मृत्यूचे कारण लसीचा दुष्परिणाम असल्याचा दावा याचिकेत केला आहे.
Mumbai High Court
Mumbai High Courtsarkarnama

मुंबई: कोरोना लस कोविशील्डच्या दुष्परिणामांमुळे माझ्या मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत दिलीप लुणावत (Dilip Lunawat) यांनी याचिका दाखल केली आहे. त्यांनी एक हजार कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे.

याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) भारत सरकार, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्स आणि डीसीजीआय प्रमुखांना नोटीस पाठवली आहे.

दिलीप लुनावत यांनी मुंबई उच्च न्यायालयात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांच्याविरोधात याचिका दाखल केली आहे. आता मुंबई उच्च न्यायालयाने याचिकेशी संबंधितांकडून उत्तरे मागवली आहेत.लुणावत त्यांची मुलगी डॉ. स्नेहल लुणावत यांचा कोरोना लस कोविशील्डच्या दुष्परिणामांमुळे मृत्यू झाला असल्याचा आरोप या याचिकेत केला आहे.

औरंगाबाद येथील याचिकाकर्ते दिलीप लुणावत यांनी मुलीच्या मृत्यूचे कारण लसीचा दुष्परिणाम असल्याचा दावा याचिकेत केला आहे. स्नेहल या एमएमबीटी डेंटल कॉलेज आणि हॉस्पिटल, धामणगाव येथे वरिष्ठ लेक्चरर होत्या. वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस घेण्यास सांगण्यात आले. त्यानंतर त्यांच्या मुलीलाही ही लस घ्यावी लागली.

Mumbai High Court
Dasara Melava 2022 : दसरा मेळाव्याबाबत अजित पवारांचे सूचक व्यक्तव्य

२८ जानेवारी २०२१ रोजी स्नेहल यांनी लस घेतली. काही दिवसांनंतर, स्नेहल यांना डोकेदुखी आणि उलट्या होऊ लागल्या. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव होत असल्याचे त्यावेळी डॉक्टरांनी सांगितले. स्नेहल यांचा १ मार्च २०२१ रोजी मृत्यू झाला.

न्यायमूर्ती एस व्ही गंगापूरवाला आणि माधव जामदार यांच्या खंडपीठाने 26 ऑगस्ट रोजी या याचिकेवर नोटीस बजावली, बिल गेट्सच्या वतीने अधिवक्ता स्मिता ठाकूर (Smita Thakur) यांनी मुंबई उच्च न्यायालयाची ही नोटीस स्वीकारली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com