सरनाईक कुटूंबाला मोठा दिलासा; उच्च न्यायालयाने ईडीला दिले हे आदेश

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबियांची चौकशी सुरू आहे.
Bombay High Court asks ED not to take any coercive action against Pratap Sarnaik
Bombay High Court asks ED not to take any coercive action against Pratap Sarnaik

मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटूंबियांभोवतीचा सक्तवसुली संचालनालयाचा (ED) फास आवळत चाललेला असतानाच दिलासा मिळाला आहे. सरनाईक यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयाने ईडीला सरनाईक यांच्यासह कुटूंबियांवर कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळं येत्या 28 जुलैपर्यंत ईडीला सरनाईक कुटूंबियांना कोणतीही कठोर कारवाई करता येणार नाही. (Bombay High Court asks ED not to take any coercive action against Pratap Sarnaik)

काही दिवसांपूर्वीच प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेलं एक पत्र समोर आलं होतं. यामध्ये त्यांनी थेट राष्ट्रवादीवर आरोप केले होते. तसेच भाजपशी पुन्हा युती करण्याचा सल्लाही दिला होता. त्यावरून राज्याच्या राजकारणात मोठा गदारोळ निर्माण झाला. या पत्रात त्यांनी ईडीकडून होत असलेल्या कारवाईचा संदर्भ देत या कारवाया टाळण्यासाठी भाजपशी युती करावी, असं म्हटलं आहे. 

त्यामुळे सरनाईक यांच्यावर ईडी मोठी कारवाई करू शकते, अशी शक्यता वर्तविली जात होती. यापार्श्वभूमीवर सरनाईक यांच्याकडून न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही सरनाईक यांनी उपस्थिती लावली आहे. आज त्यांनी विधानसभेत भाषणही केलं. त्याचदरम्यान त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला. येत्या 28 जुलैपर्यंत कठोर कारवाई न करण्याचे आदेश न्यायालयाने ईडीला दिले आहेत. 

दरम्यान, बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबियांची चौकशी सुरू आहे. ईडी आणि सीबीआयने सरनाईक यांच्या घरांसह कंपनी कार्यालय, लोणावळा येथील रिसॉर्टची झाडाझडती घेतली आहे. टॉप ग्रुप आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडीने 25 नोव्हेंबरला अमित चांदोळे यांची चौकशी केली होती.  

चांदोळे यांना अटकही केली होती.  चांदोळे हे प्रताप सरनाईक यांचे व्यावसायिक भागीदार होते. टॉप्स ग्रुपकडून एमएमआरडीएला 175 कोटींच्या कंत्राटासाठी 7 कोटींची लाच देण्यात आली होती. टॉप्स सिक्युरिटीचे माजी कर्मचारी रमेश अय्यर यांनी 28 ऑक्टोबरला तक्रार दाखल केली होती.  त्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल केला होता.

राहुल नंदा यांच्या टॉप्स सिक्युरिटीकडून 100 पैकी फक्त 70 टक्के गार्ड्स वापरले जायचे. 30 टक्के गार्ड्सचा वापर केला जात नव्हता. म्हणजेच जवळपास 150च्या आसपास गार्ड्स वापरले जात नव्हते. मात्र त्याची रक्कम सगळी टॉप्सच्या ग्रुपला मिळत होती. त्यातील काही रक्कम लाच म्हणून अमित चांदोळे आणि संकेत मोरे यांना मिळत होती. यापैकी काही वाटा प्रताप सरनाईक यांना मिळत असल्याचा संशय ईडीला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com