ED : 'केदारनाथ', 'पॅडमॅन' च्या निर्मात्या प्रेरणा अरोरांवर गुन्हा दाखल

Money laundering case | "केदारनाथ, टॉयलेट - एक प्रेमकथा, पॅडमॅन, फन्ने खान, परी आदी चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली आहे. अभिनव बिंद्रा याच्यावर तिनं बायोपिक केला होता.
prerna arora
prerna arorasarkarnama

मुंबई : हिंदी चित्रपट निर्मात्या प्रेरणा अरोरा (Bollywood Producer Prerna Arora) यांच्याविरोधात ईडीकडून आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी (money laundering case )गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्रिअर्ज एण्टरटेन्टमेंट ही त्यांची संस्था आहे. काल ईडीनं त्यांना समन्स बजावलं होतं. आर्थिक फसवणुकीचा आरोप प्रेरणा अरोरा यांच्यावर आहे. (prerna arora latest news)

बुधवारी त्यांना समन्स बजावण्यात आले होते, परंतु त्या चौकशीला हजर राहू शकल्या नाहीत, त्या कामाच्या निमित्ताने शहराबाहेर असल्याचे त्याचे तिचे वकील विवेक वासवानी यांनी सांगितले. वासवानी यांनी चौकशीसाठी वेळ मागितला होता. या आधीही प्रेरणा यांच्यावर आर्थिक फसवणुकीचे अनेक आरोप झाले आहेत.

prerna arora
..तरी आदित्य सेना म्हणते आम्ही करून दाखवले ; राणेंनी ठाकरेंना डिवचलं

प्रेरणा यांना २०१८ मध्ये आर्थिक गुन्हे शाखेकडून चित्रपट निर्माता वासू भगनानी यांची 31.6 कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. "केदारनाथ, टॉयलेट - एक प्रेमकथा, पॅडमॅन, फन्ने खान, परी आदी चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली आहे. अभिनव बिंद्रा याच्यावर तिनं बायोपिक केला होता.

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Ed Summons Sanjay Raut) यांना ईडीकडून समन्स बजावले होते. या समन्सनुसार ईडीने त्यांना आज (20 जुलै) चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे, त्यामुळे चौकशीसाठी आज उपस्थित राहु शकत नसल्याचे राऊतांनी ईडीला कळविले आहे. ७ आँगस्ट रोजी उपस्थित राहण्यासाठी राऊतांनी ईडीकडे मुदत मागितली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in