MPSC News : चार वर्षांनंतर नायब तहसीलदारांची निवड रद्द; 'एमपीएससी'ची कारवाई, काय आहे कारण?

Fake Certificates : बोगस प्रमाणपत्रांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
MPSC
MPSC Sarkarnama

MPSC and Fake Certificate : राज्यात विविध कारणांनी बोगस प्रमाणपत्रांचा मुद्दा कायम चर्चेत असतो. दरम्यान, २०१९ मध्ये निवड झालेल्या नायब तहसीलदारांची निवड बोगस प्रमाणपत्रांमुळे रद्द करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी)ने याबाबत सोमवारी (ता. २९) ट्विट करून माहिती दिली आह.

'एमपीएससी'ने (MPSC) अनिल बाबुराव पाटील व जयश्री गोविंद नाईक यांची नायब तहसीलदार म्हणून केलेली निवड रद्द केली आहे. या प्रकरणी अधिक माहितीनुसार, 'एमपीएससी'च्या राज्यसेवा परीक्षा २०१९ मध्ये खेळाडू कोट्यातून अनिल पाटील आणि जयश्री नाईक यांची निवड झाली होती.

त्यांनी खेळाडू असल्याचा केलेला दावा 'एमपीएससी'च्या पडताळणीत खोटा असल्याचे समोर आहे. त्यामुळे अनिल पाटील आणि जयश्री नाईक यांची नायब तहसीलदार पदासाठी करण्यात आलेल्या शिफारस रद्द करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे अनेक उमेदवारांच्या बोगस प्रमाणपत्रांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

MPSC
Nana Patole News : विधानसभा, लोकसभा निवडणूक होईपर्यंत मीच प्रदेशाध्यक्ष; पटोलेंनी स्पष्टच सांगितलं

एखाद्या उमेदवाराकडून विविध आरक्षणाबाबत दावा केल्यानंतर ते आरक्षण सिध्द करणारी कागदपत्रे सादर करणे आवश्यक असते. अन्यथा त्यांची निवड कोणत्याही पातळीवर रद्द होऊ शकते. आयोगाकडून कोणत्याही पदांसाठी उमेदवारांची निवड करताना त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाते. त्यानंतर त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होते. तसेच फसवणूक केली असल्यास त्यांना पुन्हा परीक्षा देण्यापासून प्रतिबंधित केले जाते. त्यानुसार सोमवारी आयोगाने नायब तहसीलदार पदासाठी निवड झालेल्या दोन उमेदवारांना कायमस्वरुपी प्रतिबंधित केल्याचे जाहीर केले आहे.

MPSC
Nana Patole Latest News : कसब्याप्रमाणेच पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठीही नाना पटोलेंनी हेरुन ठेवला उमेदवार; तयारीही सुरु झाली अन्...

'एमपीएससी'ने अधिकृत ट्विटरवर म्हटले की, "अनिल बाबुराव पाटील व जयश्री गोविंद नाईक यांची नायब तहसीलदार पदावर निवड झाली होती. राज्यसेवा परीक्षा २०१९ मधून त्यांची निवड झालेली होती. त्यावेळी त्यांनी पात्र खेळाडू असल्याचा दावा केला होती. तो दावा खोटा ठरला आहे. खोटा दावा करून त्यांनी आयोगाची फसवणूक केली. त्याबद्दल त्यांची शिफारस रद्द करण्यात आली. तसेच त्यांना कायमस्वरुपी प्रतिरोधित करण्यात आले आहे."

या प्रकरणानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. याबाबत स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा राज बिक्कड म्हणाला की, "गेली अनेक वर्ष बोगस प्रमाणपत्रांचा सुळसुळाट सुरू आहे. अशी बोगस प्रमाणपत्रे देऊन अनेक विद्यार्थ्यांनी फायदा उचललेला आहे. प्रशानसाची फसवणूक केली आहे. याचा फटका प्रामाणिकपणे अभ्यास करून प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com