राणे लढाई जिंकले! अखेर मुंबई महापालिकेने घेतली माघार

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Narayan Rane
Narayan Rane sarkarnama

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राणेंच्या जुहू येथील आदिश बंगल्यातील (Adish Bunglow) बेकायदा बांधकाम प्रकरणी मुंबई महापालिकेने (BMC) कारवाईची नोटीस बजावली होती. मात्र, महापालिकेने उच्च न्यायालयात (High Court) माघार घेतली आहे. बंगल्यावरील कारवाईचे आदेश मागे घेत असल्याचे महापालिकेने उच्च न्यायालयात सांगितले. यामुळे राणेंच्या बंगल्यावरील कारवाई टळली आहे.

राणेंच्या जुहू येथील आदिश बंगल्यातील बेकायदा बांधकामप्रकरणी मुंबई महापालिकेने त्यांना दोनदा नोटीस बजावली होती. पालिकेने पाठवलेल्या नोटिशीनंतर राणेंनी वकिलांमार्फत बंगल्यातील अंतर्गत बांधकाम नियमानुसार असल्याचा दावा केला होता. हा दावा फेटाळून महापालिकेने पुन्हा नोटीस पाठवत बांधकाम हटवण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, आज महापालिकेने कारवाईचे हे आदेश मागे घेत असल्याची माहिती मुंबई उच्च न्यायालयात दिली. (Narayan Rane News)

Narayan Rane
आधी शिंदेंचा फोन अन् नंतर मातोश्रीवरून सूत्रे हलताच उत्तरच्या मैदानातून सय्यद यांची माघार

आदिश बंगल्यावरील कारवाईसंदर्भात आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. राणे यांनी त्यांच्या कंपनीच्या वतीने आदिश बंगल्याबाबत याचिका दाखल केली होती. मुंबई महापालिका त्यांच्या बंगल्यावर तोडक कारवाई करणार होती. त्या आदेशाविरोधात दाखल याचिकेवर आज सुनावणी झाली. या सुनावणीवेळी आदिश बंगल्यावरीस कारवाईचा आदेश मागे घेण्यात येईल, असे महापालिकेने उच्च न्यायालयाला सांगितले. मुंबई महापालिकेचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोनी यांचे उच्च न्यायालयात ही माहिती दिली आहे. यामुळे नारायण राणे यांना कारवाईपासून दिलासा मिळाला आहे.

Narayan Rane
पेट्रोल, डिझेलच्या दरात आठ दिवसांत सात वेळा वाढ; लिटरमागे 5 रुपयांनी महागलं

राणे यांच्या जुहू येथील आदिश बंगल्यात अनाधिकृत बांधकाम केल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी केली होती. त्यानंतर मुंबई महापालिकेने राणे यांना तीन वेळा नोटीस देत अनधिकृत बांधकाम काढून टाकण्यात यावे; अन्यथा कारवाई करण्यात येईल असे सांगितले हेाते. त्यानंतर हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेले होते. आता या प्रकरणी महापालिकेने माघार घेतली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com