मुख्यमंत्र्यांना त्रास होऊ नये म्हणून रस्ता एकदम गुळगुळीत होणार...

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) उपस्थित राहणार
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

sarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आजारपणामुळे विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला हजेरी लावणार की नाही, यावर बरीच चर्चा राजकीय वर्तुळात आहे. खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ते येणार असल्याचे आता स्पॅम्प पेपरवर लिहून दिले आहे. त्यामुळे आता प्रशासनही अलर्ट झाले आहे.

Uddhav Thackeray
`मुख्यमंत्र्यांची तब्येत चांगली आहे, हे स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का?`

मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षिततेसाठी वर्षा बंगल्यापासून विधान भवनाकडे वळणाऱ्या रस्त्यांची डागडुजी हाती घेण्यात आली आहे. मानेची शस्त्रक्रिया झाल्याने प्रवासात मुख्यमंत्री ठाकरे त्रास होऊ नये, म्हणून ही व्यवस्था करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. हे अंतर काही किलोमीटरचे आहे. या रस्त्यावरून खरे तर सतत व्हीआयपी ये-जा करत असतात. तरीही या रस्त्याची गुणवत्ता म्हणावी अशी नाही.

Uddhav Thackeray
धनंजय मुंडेंनी वरिष्ठांचा आदर ठेवला... जयंत पाटलांना स्वतः चहा आणून दिला...

या खराब रस्त्यावरून अनेक मंत्री रोजच प्रवास करत असले तरी प्रशासनचे त्याकडे लक्ष नव्हते. आता मात्र मुख्यमंत्र्यांच्या आजारपणामुळे का होईना प्रशासनाला जाग आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या मानेची शस्त्रक्रिया झाली असल्याने त्यांच्यासाठी अतिशय काळजी घ्यावी लागते आहे. प्रवास करताना रस्त्यावरील स्पीड ब्रेकर, खड्डे यांचा त्यांना त्रास होणार नाही, यासाठी रस्त्याची डागडुजी सुरू आहे.

Uddhav Thackeray
विधानसभेतील काही आमदार पुन्हा गॅलरीत, तर पीए पार्किंगमध्ये!

मुंबईतील रस्त्यांची अवस्था, त्यांची देखभाल आणि त्यावरील खर्चाची आकडेवारी यावरून शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असतात. आता या व्हीआयपी रस्त्याचीही या आरोपांच्या यादीत भर पडू शकते. मुख्यमंत्री सध्या मातोश्रीतूनच कारभार पाहत आहेत. काही मिनिटांसाठी ते काल `वर्षा`वर आले होते. सध्या तरी व्हीडीओ काॅलद्वारेच ते सहकारी मंत्र्यांशी आणि पक्षातील नेत्यांशी संपर्कात आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com