शिवसेना-भाजपच्या वादात उड्डाणपूल राहणार बिननावाचा!

मानखुर्द येथील उड्डाणपुलाचे नामकरण करण्यावरुन शिवसेना-भाजपमध्ये वाद पेटला आहे.
bmc says mankhurd flyover naming is on hold for now
bmc says mankhurd flyover naming is on hold for now

मुंबई : मानखुर्द येथील उड्डाणपुलाचे (Mankhurd Flyover) नामकरण करण्यावरुन शिवसेना (Shivsena) - भाजपमध्ये (BJP) वाद पेटला आहे. त्यामुळे तूर्तास या उड्डाणपुलाचे नामकरण न करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. पुलाचे बांधकाम सुरू असल्याने सध्याच्या परिस्थितीत नामकरण करणे सयुक्तिक ठरणार नाही, अशी भूमिकाही महापालिकेने घेली आहे. 

मानखुर्द येथे घाटकोपर-मानखुर्द जोडरस्त्यावर उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू आहे. या उड्डाणपुलाच्या नामकरणावरून शिवसेना-भाजपमध्ये वाद पेटला होता. भाजपचे खासदार मनोज कोटक यांनी या उड्डाणपुलाचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल करावे, असे पत्र महापालिकेला मागील वर्षी डिसेंबरमध्ये दिले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण करणाऱ्या शिवसेनेला हिंदुत्वाप्रमाणे शिवरायांच्या नावाचे वावडे आहे का, असा सवालही कोटक यांनी केला होता. 

काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी या उड्डाणपुलाचे नामकरण करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 14 जूनला पत्र दिले होते. शेवाळे यांनी या उड्डाणपुलाला सुफी संत सुल्तानुल हिंद ख्वाजा गरीब नवाज मोईनुद्दीन सुफी चिश्ती- अजमेरी यांचे नाव देण्याची मागणी केली होती. त्यावरून वाद निर्माण झाला होता. स्थानिक जनतेच्या मागणीनुसार संत मोईनुद्दीन चिश्ती यांचे नाव देण्याची मागणी केल्याचे शेवाळे यांनी सांगितले होते. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत असून त्यांच्या नावाला विरोध नाही. याबाबत राज्य सरकार जो निर्णय घेईल तो मान्य असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

महापालिकेने याबाबत आता उपनगरे स्थापत्य समितीत लेखी भूमिका मांडली आहे. उड्डाणपुलाचे बांधकाम अद्याप सुरू असल्यामुळे नामकरण करणे तांत्रिकदृष्ट्या योग्य नसल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. या उड्डाणपुलाच्या नामकरणाबाबत डिसेंबर २०२० मध्ये शिवसेना-भाजपकडून तीन प्रस्ताव दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे हे तिन्ही प्रस्ताव पुलाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यासाठी होते. याबाबत स्थापत्य समितीला शिवसेनेच्या नगरसेविका वैशाली शेवाळे यांनी 1 डिसेंबर, मनोज कोटक यांनी 9 डिसेंबर आणि शिवसेना नगरसेविकेने १५ डिसेंबरला  पत्र दिले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com