BMC News : मुंबई पालिकेची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई : ५३ कर्मचारी निलंबित, तर ५५ थेट बडतर्फ!

BMC News : कर्मचाऱ्यांविरोधात अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या!
BMC News
BMC News Sarkarnama

BMC News : मुंबई मनपा प्रशासनानकडून भ्रष्टाचाराच्या विरोधात मोहीम राबवण्यास सुरूवात केली आहे. मनपाने धडाका लावत पालिकेमधील आढळून आलेल्ल भ्रष्ट ५५ कर्मचाऱ्यांना थेट सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. तर आणखीही ५३ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आहे.

विविध भ्रष्टाचाराच्या आरोपात दोषी आढळलेल्या प्रकरणात काही कर्मचाऱ्यांना निलंबित करणयात आले होते. एकूण ५५ कर्मचाऱ्यांना सेवेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आले आहे. यांच्यापैकी ५३ जणांवर गुन्ह्याची नोंद झालेले होती. अन्य फौजदारी प्रकरणातही गुन्हा नोंद झालेले ८१, असे १३४ कर्मचाऱ्यांना डच्चू देण्यात आले आहे. महापालिकेने धडाका लावतप्रशासना कडून कठोर कारवाई समजली जात आहे .

BMC News
Pimpri-Chinchwad Ncp News : तर 'चिंचवड' बिनविरोध करू, राष्ट्रवादीने घेतली महत्त्वाची भूमिका

कारवाई झालेल्या कर्मचाराऱ्यांना आपली नोकरीतून गमवावी लागली. यासोबत निवृत्ती वेतन, ग्रॅच्युइटी अशा कर्मचाऱ्यांना मिळणारे लाभ ही आता त्यांना मिळणार नाही. यापुढे त्यांना शासनाच्या कोणत्याही नोकरीसाठी अर्ज करण्यात बंदी असणार आहे. ‘बडतर्फ करणे’ ही प्रशासनीतील ही शासन पातळीवरील कठोर शिक्षा समजली जाते.

BMC News
Threat to Leaders : पवारांपासून, गडकरी अन् केजरीवालांपर्यंत नेत्यांना धमकीचे फोन; कारण काय?

लाचलुचपत प्रतिबंधक विभागात दाखल असलेल्या १४२ प्रकरणात पालिकेतील एकूण २०० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या १४२ प्रकरणापैकी १०५ प्रकरणात खटला दाखल करण्यात यावा, यासाठी अभियोग पूर्व मान्यता पालिका प्रशासनाने दिली. तर राहिलेल्या ३७ पैकी ३० प्रकरणात अजूनही विभाग स्तरावर तपास सुरू आहे. यामुळे या प्रकारणामध्ये अजूनही प्रस्ताव महानगरपालिकेने प्रशासनाकडे प्रस्ताव पाठवलेला नाही.

ही प्रकरणे आता मंजुरीसाठी पाठवल्यास पालिका प्रशासन यायाविषयी योग्य ती कार्यवाही महानगरपालिका प्रशासनाकडून यावर कठोर कारवाई करण्यात येईल. उर्वरित ७ प्रकरणांपैकी ४ प्रकरणांत मंजुरी देण्याबाबतचा प्रस्ताव लाचलुचपत प्रतिबंध विभागाला पाठवण्यात आला आहे. व इतरही ३ प्रकरणांत मंजूरी देण्याबाबतची कार्यवाही आता अंतिम टप्प्यात असल्याचे समजते आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com