BMC News : मुंबई महापालिकेच्या तब्बल २०० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची 'लाचलुचपत'कडून चौकशी सुरू

Anti Corruption bureau News : एसीबीकडून १०५ प्रकरणी दोषारोपपत्र दाखल
BMC, ACB
BMC, ACB Sarkarnama

Mumbai News : कोरोना काळातील भ्रष्टाचारावरुन मुंबई महापालिकेवर यापूर्वी गंभीर आरोप करण्यात आले आहेत. कोरोना कालावधीत झालेल्या आर्थिक व्यवहाराविषयी महापालिकेची 'कॅग'मार्फत चौकशी सुरू आहे. मात्र, याच दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून भ्रष्टाचाराच्या विविध प्रकरणांमध्ये चौकशी सुरू असल्याचं समोर आलं आहे.

'द यंग व्हिसल ब्लोअर्स फाऊंडेशन''चे जितेंद्र घाडगे यांनी मुंबई महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर भ्रष्टाचाराच्या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागा(ACB)कडून कारवाई करण्यात येते. आत्तापर्यंत कारवाई झालेले अधिकारी, कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू आहे, किती जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच किती प्रकरणी कायदेशीर कारवाई झाली आहे याबाबतची माहिती घाडगे यांनी मागितली होती. यात धक्कादायक बाब समोर आली आहे.

BMC, ACB
Modi Government : मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटातील कुणाची वर्णी लागणार? 'ही' दोन नावं आघाडीवर

पालिकेच्या तब्बल २०० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भ्रष्टाचाराच्या १४२ प्रकरणांत एसीबीतर्फे चौकशी सुरू आहे. या १४२पैकी १०५ प्रकरणांमध्ये न्यायालयात आरोपपत्र दाखल केले असून, ३७ प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल करणे बाकी आहे अशी माहिती पालिकेने माहितीच्या अधिकारात दिली आहे.

१४२ प्रकरणांमध्ये दोषारोपपत्र तसेच एसीबीला एफआयआर दाखल करण्यास मंजुरी नाकारल्याबाबतची वर्गीकृत माहिती जतन करण्यात येत नाही. तसेच ३७७ प्रकरणांमध्ये एसीबीला चौकशीसाठी पालिकेने मंजुरी दिलेली नाही, असे असले तरी एसीबीकडून १०५ प्रकरणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं आहे असं पालिकेनं लेखी उत्तरात स्पष्ट केलं आहे.

BMC, ACB
CM News : जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री म्हणाले, सांगू का ? अन् चव्हाणांचे वाढले टेन्शन..

३७७ प्रकरणांत चौकशीसाठी मंजुरी नाही...

भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८च्या कलम १७ ए अन्वये एसीबीमार्फत चौकशी सुरू करण्यास मंजुरी देण्याच्या विषयावर पालिकेने दिलेल्या उत्तरात एकूण ३९५ प्रकरणांपैकी ३७७ प्रकरणांमध्ये एसीबीला चौकशीसाठी मंजुरी दिलेली नाही. तर १८ प्रकरणे पालिकेच्या विभागनिहाय चौकशीत प्रलंबित आहेत अशी माहिती माहितीच्या अधिकारात देण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in