'किरीट सोमय्या म्हणजे तमाशातला गांजाडा'

मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर (BMC Mayor Kishori Pednekar) यांनी किरीट सोमय्यांवर (Kirit Somaiya) जोरदार टीका केली आहे.
 kishori pedneka & kirit somaiya
kishori pedneka & kirit somaiya Sarkarnama

मुंबई : किरीट सोमय्यांना (Kirit Somaiya) फक्त बोलण्यासाठी ठेवले आहे. ते निव्वळ आरोप करतात. पुरावे असल्यास सादर करा त्याबाबत दोषी आढळल्यास आम्ही शिक्षा भोगायला तयार आहोत. आम्हाला विचलित करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, आम्ही विचलित होणार नाही. सोमय्या हे तमाशातला गांजाडीया सारखे वागत असल्याची जोरदार टीका मुंबई महापालिकेच्या (BMC) महापौर किशोरी पेडणेकर (BMC Mayor Kishori Pednekar) यांनी किरीट सोमय्यांनर केली आहे.

 kishori pedneka & kirit somaiya
मंत्र्यानं राजीनामा दिल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांना आली खडबडून जाग

पेडणेकर म्हणाल्या, सोमय्या हे केवळ आरोप करत सुटले आहे. त्यांच्याकडे कुठलेही पुरावे नाहीत. ते फक्त बिनबुडाचे आरोप करतात आणि मिडीयावर धूमाकूळ घालतात. स्वत:ला समोर करण्यासाठी ते प्रत्येकाच्या अब्रु काढतात. मात्र, आमची आब्रु इतकीही तकलादु नाही की, अश्या ठेवलेल्या माणसांने कधीही उठाव आणि काहीही आरोप करावे. त्यांचे अनेक तमाशे हे लोकांनी बघीतले आहेत. तमाशामध्ये असलेला गांजाडीया सारखे त्यांचे काम आहे. त्यामुळे यांच्यावर लक्ष का द्यावे, असा प्रश्न पडतो, अश्या शब्दात पेडणेकरांनी घणाघात केला आहे.

सोमय्याकडे काही पुरावे असल्यास सादर करा. मात्र, एका तिराने सर्वांना मारण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. यांनी आतापर्यंत केलेला एकतरी आरोप त्यांनी सिद्ध केला का? असा सवाल पेडणेकरांनी सोमय्यांना केला. त्या म्हणाल्या की, ज्या-ज्या वेळी सोमय्या माझ्या पक्षावर बोलतील त्यावेळी मी उत्तर देणारच, असे त्यांनी स्पष्ट केले. कुठलेही काम एका सिस्टमनुसार चालते. त्यामध्ये काही चुकीचे झाले असेल तर, ते सिद्ध करा त्यावर आम्ही कारवाई करू मात्र, याला बाजूल ठेवत माझ्यावर, अदित्य ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व यशवंत जाधव यांच्यावर टीका करत आहेत. यशवंत जाधव त्यांच्यावर झालेल्या आरोपोचे उत्तर द्यायला ते सक्षम आहेत. मिडीया दिसला की निव्वळ टीका करण्याचे काम विरोधकांकडून केले जात आहे. अशी टीका पेडणेकरांनी केली आहे.

 kishori pedneka & kirit somaiya
भाजप अडचणीत : मुख्यमंत्री योगींचे दिल्लीत पाऊल अन् मंत्र्यानं दिला झटका

दरम्यान, सोमय्यांनी पुन्हा एकदा शिनसेनेवर निशाणा साधत मुंबई महापालिकेत घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, "उद्धव ठाकरे यांच्या सेनेचे पालिका म्हणजे, कमाईचे साधन आहे. कोविडमध्ये यांनी जी लूट केली, त्याचे घोटाळे मी आता मांडणार आहे. आज मी पुराव्यासह 15 कोटी स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी कशापद्धतीने एजंटला दिले. हे सांगणार आहे. असे म्हणत किरीट सोमय्यांनी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर टीकास्त्र डागले आहे. ते आज (ता.11 जानेवारी) मुंबई येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेच बोलत होते.

सोमय्या म्हणाले, यशवंत जाधव यांनी 15 कोटी तुकड्या तुकड्यांनी दिले. प्रधान डीलर्स प्रायव्हेट लि. च्या खात्यात हे पैसे ट्रान्सफर करण्यात आले. प्रत्येकी 1 रुपयाचा शेअर त्यांनी 500 रुपयांनी घेतला, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच, त्यानंतर जाधव यांच्या खात्यात 2 कोटी, पत्नी यामिनी जाधन यांच्या खात्यात 2 कोटी, मुलगा निखिल जाधव यांच्या खात्यात 50 लाख, तर दुसरा मुलगा यतीन जाधव याच्या खात्यात 50 लाख रुपये वळते केल्याचा आरोपही सोमय्यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in