शेतकरी संघटनांचा २६ मे रोजी 'काळा दिन' : किसान मोर्चाची घोषणा
'Black Day' of farmers' organizations on 26th May: Kisan Morcha announcement

शेतकरी संघटनांचा २६ मे रोजी 'काळा दिन' : किसान मोर्चाची घोषणा

''आमच्या आंदोलनास येत्या २६ मे रोजी सहा महिने पूर्ण होत असून केंद्रामध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार स्थापन होऊन सात वर्षे पूर्ण होत आहे. हा दिवस काळा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे,'' असे राजेवाल यांनी स्पष्ट केले.

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात (Agriculture Amendment) दिल्लीमध्ये (Delhi) सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनास येत्या २६ मे रोजी सहा महिने पूर्ण होत आहे. केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी तो दिवस काळा दिन (Black Day) म्हणून पाळला जाणार असल्याचे संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने आज जाहीर करण्यात आले. ('Kala Din' of farmers' organizations on 26th May: Kisan Morcha announcement)

शेतकरी नेते बलबीरसिंग राजेवाल यांनी आज व्हर्च्युअल प्रेस कॉन्फरन्समध्ये याची घोषणा केली. सर्व शेतकऱ्यांनी २६ मे रोजी आपले घर, वाहने आणि दुकाने यांच्यावर काळे झेंडे लावून कृषी कायद्यांचा विरोध करावा, अशी मागणी त्यांनी केली. ''आमच्या आंदोलनास येत्या २६ मे रोजी सहा महिने पूर्ण होत असून केंद्रामध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार स्थापन होऊन सात वर्षे पूर्ण होत आहे. हा दिवस काळा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे,'' असे राजेवाल यांनी स्पष्ट केले.

आंदोलनाची केंद्रे...

मागील सहा महिन्यांच्या काळामध्ये या आंदोलनाने वेगवेगळी वळणे घेतली. यामुळे तिकरी, सिंघू आणि गाझीपूर हा सीमाभाग हा आंदोलनाचा केंद्रबिंदू बनले. आताही देशभरातील लोकांनी या आंदोलनामध्ये सहभागी होऊन आम्हाला पाठिंबा द्यावा. या आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुतळ्यांचे दहन करण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली आहे.

केंद्र सरकारने तातडीने कृषी कायदे मागे घ्यावेत. सध्या खते, डिझेल आणि पेट्रोल यांच्या किमती सातत्याने वाढत असल्याने शेती करणे अधिक अवघड होऊन बसले आहे.

- बलबीरसिंग राजेवाल (शेतकरी नेते)

Related Stories

No stories found.