BKC Dasara Melava : शिंदेंची गर्दी भाडोत्री, धार नसलेली त्यांची तलवार ; दानवेंनी वात पेटवली..

BKC Dasara Melava : मुंबईला येण्यापूर्वी अंबादास दानवे यांनी औरंगाबादची ग्रामदैवता कर्णपुरा देवीची आरती केली. "या मेळाव्याला यश मिळू दे," अशी प्रार्थना त्यांनी केली.
BKC Dasara Melava live
BKC Dasara Melava live sarkarnama

मुंबई : शिवसेनेतल्या बंडानंतर आज (बुधवारी) होणाऱ्या दसरा मेळाव्याकडे (Dasara Melava) सगळ्याचे लक्ष लागलं आहे. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात सर्वार्थाने ऐतिहासक हा मेळावा ठरणार आहे. दोन्ही गटाच्या दसऱ्या मेळाव्यावर त्यांचे राजकीय भवितव्य अवलंबून असणार आहे. मैदानातील लढाई अतितटीची होताना सोशल मीडियावरही दोन्ही गटांने ऑनलाइन प्रमोशनची जोरदार लढाई सुरु केली आहे. (BKC Dasara Melava latest news)

राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक मेळाव्यासाठी शिवाजी पार्क येथे दाखल होत आहेत. शिवसेनेचे नेते, विरोधी पक्षनेते अंबादान दानवे (Ambadas Danve) हे मुंबईत दाखल झाले असून त्यांनी शिवाजीपार्क येथील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळांच दर्शन घेतलं. त्यानंतर दानवे यांनी शिंदे गटावर टीका केली आहे. ते म्हणाले, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गर्दी ही भाडोत्री आहे. त्यांची तलवार धार नसलेली तलवार आहे,"

उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यास दीड लाख तर शिंदेंच्या मेळाव्यास तीन लाख शिवसैनिक येतील, असा दावा दोन्ही गटाकडून करण्यात आला आहे. दानवे हे दसरा मेळाव्यासाठी औरंगाबादहून मुंबईला येण्यापूर्वी त्यांनी औरंगाबादची ग्रामदैवत कर्णपुरा देवीची आरती केली. त्यांनी कर्णपुरा देवीला साकडं घातलं."या मेळाव्याला यश मिळू दे," अशी प्रार्थना त्यांनी केली.

BKC Dasara Melava live
Dasara Melava 2022 : राजकारण पेटलं ; राजीनामा देतो, असे म्हणणाऱ्या शिंदेंचे 'ते' भाषण व्हायरल

मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावरही त्यांनी टीका केली. शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी मराठवाड्यातून पाचशे गाड्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे सत्तार यांनी म्हटलं आहे. यावर दानवे यांनी कडाडून टीका केली. दानवे म्हणाले, "पाचशे गाड्या कुठेही नाहीत, या सगळ्या वल्गना आहेत. आम्ही एसटी महामंडळाकडूनही माहिती काढली आहे. अब्दुल सत्तार यांच्याकडून 500 गाड्या सोडण्यात आल्याचा दावा फसवा आहे,"

BKC Dasara Melava live
Dasara Melava : शिंदे गटाच्या मेळाव्यात व्यासपीठावर बाळासाहेबांची खूर्ची अन् चाफ्याची फुलं..

"गद्दारीच्या पिकाचा नायनाय करण्यासाठी देवीकडे प्रार्थना केली आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा ऐतिहासिक असतो. महाराष्ट्रात शिवाजी पार्कवरुन विचारांचं सोनं लुटलं जातं. तसंच ते आजही लुटलं जाईल," असे अंबादास दानवे म्हणाले.

शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा 56 वर्षांपूर्वी 30 ऑक्टोबर 1966 रोजी बाळासाहेब ठाकरेंनी घेतला. शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्याची जाहिरात 'मार्मिक' या नियतकालिकामधून करण्यात आली होती. या मेळाव्या बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. या मेळाव्याला जवळपास चार लाख लोक उपस्थित होते. आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in