ED,CBI च्या माध्यमातून भाजपचा अपक्ष, छोट्या पक्षांवर दबाव; पण, राज्य सरकार आमचायं, हे लक्षात ठेवा!

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजप अपक्ष आणि काही छोट्या पक्षांवर अवलंबून आहे. भाजप त्यांना प्रलोभने दाखवत आहे. त्यांच्यावर वेगवेगळ्या मार्गाने दबाव आणत आहे, हा दबाव कशाप्रकारे आणला जातोय, याची माहिती आमच्याकडे दररोज येते.
ED,CBI च्या माध्यमातून भाजपचा अपक्ष, छोट्या पक्षांवर दबाव; पण, राज्य सरकार आमचायं, हे लक्षात ठेवा!
Sanjay Raut Sarkarnama

मुंबई : ‘‘राज्यसभा निवडणुकीत (Rajy Sabha Election) भारतीय जनता पक्षाकडून (BJP) अपक्ष आणि छोट्या पक्षांवर वेगवेगळ्या मार्गाने दबाव आणला जात आहे. ईडी (ED), सीबीआयच्या (CBI) माध्यमातून जुनी प्रकरणे उकरून काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, ईडी, सीबीआय तुमच्या हातात आहेत; परंतु इतर अनेक गोष्टींसह आमच्या हातात राज्यातील सरकार आहे, हे विसरू नका,’’ असे आव्हान खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला दिले. (BJP's pressure on independence, smaller parties through ED, CBI, : Sanjay Raut)

मुंबईत माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी भाजपवर हे आरोप केले. ते म्हणाले की, ‘‘राज्याचे मुख्यमंत्रीपद सांभाळणारी व्यक्ती मॅच्युअर्ड असायलाच पाहिजे, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आहेत. आमचे काही प्रमुख लोक त्यांच्याकडे शुक्रवारी जाऊन आले आणि त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी ठरवलंच आहे की निवडणूक लढायची. निवडणूक लढवायचीच म्हटल्यावर राजकारणात कोणी कोणाला रोखू शकत नाही. पण, भाजपनं निवडणूक लढवण्याचा निर्णय पक्का केला आहे. अर्थात, महाविकास आघाडीसुद्धा राज्यात सत्तेवर आहे, त्यामुळे आम्हीदेखील तेवढ्याच मजबुतीने निवडणुकीत उतरलो आहोत.’’

Sanjay Raut
गडकरींचे भाषण ऐकून मलाही एक साखर कारखाना काढावासा वाटतोय; पण... : ठाकरे

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भारतीय जनता पक्ष अपक्ष आणि काही छोट्या पक्षांवर अवलंबून आहे. भाजप त्यांना अमिषं आणि प्रलोभने दाखवत आहे. त्यांच्यावर वेगवेगळ्या मार्गाने दबाव आणणार, हा दबाव कशाप्रकारे आणला जातोय, याची माहिती आमच्याकडे दररोज येते. कारण ज्यांच्यावर दबाव आणला जातोय, ते आमचेही मित्र आहेत. ते आम्हाला सांगतात की, कशा प्रकारे दबाव आणला जातोय. दबाव आणि काही जुनी प्रकरणं जी केंद्राच्या अखत्यारीत आहेत, ती उकरून काढून प्रेशर तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण, त्याचा काही फरक पडत नाही. त्यातून भारतीय जनता पक्षाचे चरित्र दिसून येतं. राज्यात अशा प्रकारे निवडणुका लढवल्या जात असतील, तर राज्यातील जनता डोळसपणे पाहत आहे, असेही राऊत म्हणाले.

Sanjay Raut
संजय राऊत अन् शिवसेनेनं तुमची धुणी-भांडी करायची का ? ; मनसेनं डिवचलं

चारही जागा महाविकास आघाडी अगदी व्यवस्थितपणे जिंकणार आहे. उगाच भाजपने त्यांचे पैसे वाया घालवू नयेत, एखाद्या सामाजिक कार्यासाठी वापरावेत. अशी सवय आणि चटक त्यांनी लावू नये. आम्ही समर्थ आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे समर्थ नेतृत्व आहेत. निवडणुका आम्ही काही आताच लढवत नाही. गेल्या ५० वर्षांपासून लढत आहे. अशा निवडणुकींचा सगळ्यात जास्त अनुभव आम्हाला आहे. फक्त आमच्या हातात ईडी नाही. ईडी, सीबीआय तुमच्या हातात आहेत; परंतु इतर अनेक गोष्टी आमच्या हातात आहेत, सरकार आहे, हेही विसरू नका, असे आव्हान राऊतांनी भाजपला दिले.

Sanjay Raut
अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाबाबत अजित पवारांचे मोठे वक्तव्य...

कोण कोणसोबत हे तुम्हाला दहा तारखेला कळेल

बहुजन विकास आघाडीबाबत बोलताना राऊत म्हणाले की, कोण कोणासोबत आहे, हे दहा तारखेला कळेल, तुम्ही आताच कशाला पत्ते पिसत आहात. आत्ताच कशाला फुलबाजे उडवत आहात. बहुजन विकास आघाडी, एमआयएम, समाजवादी पक्ष, बच्चू कडू आणि त्यांचे आमदार, शेतकरी संघटना आणि इतर पक्ष कुठे आहेत, हे दहा तारखेला तुम्हाला कळेल, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.

Sanjay Raut
राज्यसभा बिनविरोधसाठी प्रयत्न केले; मात्र मार्ग निघाला नाही : अजित पवारांनी व्यक्त केली खंत

धनंजय मुंडेंच्या दाव्यावर शिवसेनेची चुपी

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी पुढचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचा असेल, असे वक्तव्य केले आहे. त्याबाबत संजय राऊत यांनी सांगितले की, ते काय म्हणाले, ते मला माहित नाही. ज्याविषयी मला माहिती नाही, त्या विषयावर मी बोलणार नाही. एम्परिकल डाटा गोळा करण्याचे काम चालू आहे. सरकार आपले काम चोखपणे करत आहे, असेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in