बाबासाहेबांच्या 'त्या' प्रतिज्ञेला भाजपचा विरोध, मात्र आठवले म्हणतात...

Ramdas Athawale : राम, कृष्ण यांना देव मानणार नाही, याचाही समावेश प्रतिज्ञेत होता.
Ramdas Athawale
Ramdas AthawaleSarkarnama

मुंबई: धम्म चक्र परिवर्तन दिनाच्या दिवशी नागपूर येथे आयोजित सोहळ्यामध्ये दिल्ली विधानसभेचे मंत्री उपस्थित होते. यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायींना सांगितलेल्या 22 प्रतिज्ञांचे प्रकट वाचन करण्यात आले होते. यामध्ये राम, कृष्ण यांना देव मानणार नाही, याचाही समावेश होता. आपच्या नेत्यानेही ही प्रतिज्ञा घेतली होती. भाजपने याला विरोध करत, आप नेत्याला हिंदू विरोधी ठरवले आहे. यावरून वाद ताजे असतानाच आता भाजप सरकारमध्ये केंद्रीय मंत्री असलेले रामदास आठवले यांनी 22 प्रतिज्ञांचे समर्थन केले.

"आम्हाला बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञांचा अभिमान आहे. या प्रतिज्ञा आम्हाला मान्यच आहेत आणि प्रत्येक बौद्धाने या प्रतिज्ञांचं पालन केलं पाहिजे," असे आठवले यांनी म्हटले आहे. आता आठवलेंनी घेतलेल्या भूमिकेमुळे भाजपची राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर पुरती कोंडी झाली आहे. आठवलेंनी पत्रकारांशी संवाद साधताना ही रोखठोक भूमिका जाहीर केली आहे.

Ramdas Athawale
साईबाबासह 6 आरोपींची सुटका नाहीच, सुप्रीम कोर्टाचा आदेश : काय आहे संपूर्ण प्रकरण?

14 ऑक्टोबर 1956 या दिवशी बाबासाहेबांनी आपल्या हजारो अनुयायींसोबत धर्मांतर केले होते. देशभरातील आपल्या अनुयायांना बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा बहाल केल्या होत्या. प्रत्येक बौद्ध माणसाने या 22 प्रतिज्ञांचे पालन करायला हवे. हिंदू धर्मातून धर्मांतर करून बौद्ध धम्म स्वीकारणाऱ्या प्रत्येकाला धम्म दीक्षा विधीमध्ये या 22 प्रतिज्ञांचे पालन करावे असे सांगण्यात येते.

Ramdas Athawale
गिरणी कामगारांनी पुन्हा वातावरण तापवलं!

मी स्वतः बौद्ध धर्मिय आहे. बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञाला माझा कायम ठाम पाठिंबा आहे. त्यामुळे या २२ प्रतिज्ञांचा मी कधीही विरोध केला नाही, करणार नाही. जर असे कुठे माझ्या वक्तव्यातून तसा अर्थ निघत असेल तर, मी स्वतः त्या शब्दांना मागे घेतो. मात्र मी कधीही बौद्ध सिद्धांतापेक्षा वेगळी आणि चुकीची भूमिका घेतलेली नाही, असंही त्यांनी आठवले यांनी सांगितले.

भाजप नेते कपिल मिश्रा यांनी ट्वीट करून यावर आक्षेप नोंदवला होते. अरविंद केजरीवाल यांचे मंत्री हिंदू देवदेवतांवर टीका करत आहेत. तर दुसरीकडे केजरीवाल हे जय श्री कृष्णा म्हणत, मतं मागत आहेत. भाजप नेते मनोज तिवारी यांनीही यावर आक्षेप घेत, आप इतका हिंदूविरोधी का आहे? असा सवाल उपस्थित केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com