राज्यातील कट्टर विरोधक भिवंडीत बनले सख्खे मित्र!

पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकला आहे.
राज्यातील कट्टर विरोधक भिवंडीत बनले सख्खे मित्र!
Namita guravSarkarnama

भिवंडी : भिवंडी पंचायत सभापतिपदाच्या झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नमिता नीलेश गुरव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडणुकीत ठरल्याप्रमाणे शिवसेनेच्या सदस्यांनी सहकार्य केल्याने पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकला आहे. (BJP's Namita Gurav elected as chairperson of Bhiwandi Panchayat Samiti help of Shiv Sena)

भिवंडी पंचायत समितीमध्ये एकुण 42 सदस्य कार्यरत आहेत. त्यात शिवसेनेचे 20, भारतीय जनता पक्षाचे 19, काँग्रेसचे 2, मनसे 1 असे पक्षीय बलाबल आहे. शिवसेना व भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या स्थानिक पातळीवर झालेल्या समझोत्यानुसार मागील गेल्या दीड वर्षापासून सभापती व उपसभापतीपदावर आलटून पालटून दोन दोन महिन्यांकरिता शिवसेना भाजपा लोकप्रतिनिधींना संधी दिली जात आहे. सभापतिपदी असलेले शिवसेनेचे रविकांत पाटील यांनी आपापसात ठरल्याप्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

Namita gurav
राजापुरात शिवसेनेचा भाजपला दे धक्का!

तहसीलदार तथा पिठासन अधिकारी अधिक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली रिक्त झालेल्या सभापतिपदाच्या निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या सभेत सभापतिपदासाठी भाजपच्या सदस्य निमिता गुरव यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात आली.

Namita gurav
भाजप बदलणार ZP अध्यक्ष : काँग्रेस-राष्ट्रवादीशी बोलण्याची या नेत्यांवर जबाबदारी!

या वेळी तहसीलदार अधिक पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते प्रताप पाटील, राजेंद्र भोईर, ललिता पाटील, मावळते सभापती रविकांत पाटील, गुरूनाथ जाधव, जिल्हा परिषद सदस्य जयवंत पाटील, दयानंद पाटील, सपना भोईर आदी सदस्यांनी निवड झाल्यानंतर सर्व सदस्यांसह सभापती नमीता गुरव यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in