Mission Vidhansabha |लोकसभेनंतर भाजपचे 'मिशन विधानसभा'; 98 प्लस'साठी कसली कंबर

Mission Vidhansabha | शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मतदारसंघावर भाजपचं विशेष लक्ष
Mission Vidhansabha |लोकसभेनंतर भाजपचे 'मिशन विधानसभा'; 98 प्लस'साठी कसली कंबर

मुंबई : महाराष्ट्रात भाजपने लोकसभेसाठी मिशन ४५ प्लसची घोषणा केली. त्यानंतर आता भाजपने लोकसभेपाठोपाठ 'मिशन विधानसभे'ची तयारीही सुरु केली आहे. गेल्या दहा वर्षांत न जिंकलेल्या ९८ मतदासंघांवर भाजपने (BJP) विशेष लक्ष केंद्रीत करणार आहे. त्यासाठी प्रत्येक पाच विधानसभा मतदारसंघामागे एक मंत्री प्रभारी म्हणून नेमण्यात येणार आहे. मिशन विधानसभेसाठी श्रीकांत भारतीय यांच्याकडे जबाबदारी देण्यात आल्याची माहिती आहे.

२०१४ च्या विधानसभा निवडणूकीत निवडणुकीत भाजपला राज्यात विधानसभेच्या १२२ जागा मिळाल्या. तर २०१९ च्या निवडणुकीत १०६ जागांवर भाजप विजयी झाला. पण आता विधानसभेच्या १४५ जागा जिंकून राज्यात स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचे मनसुबे भाजपने आखले आहेत. त्या दृष्टीने लोकसभेपाठोपाठ विधानसभा मिशनची ही तयारी भाजपने जोरात सुरु केली आहे.

मिशन विधानसभेत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मतदारसंघावर भाजपचं विशेष लक्ष असणार आहे. दसऱ्यानंतर विधानसभा प्रवास योजनेला सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आली आहे. यात पहिल्या टप्प्यात त्या विधानसभा क्षेत्रात स्थानिक स्वराज्य संस्थेत कुणाचं प्राबल्य आहे, स्थानिक गणित, मतदार यांचा आढावा घेतला जाईल.

दुसऱ्या टप्प्यात राजकीय विश्लेषण केले जाणार असून त्या मतदार संघात कुणाचं प्राबल्य आहे, हे पाहिले जाईल. तसेच काही पक्ष प्रवेश घडवून आणणं हा देखील त्या मागचा उद्देश्य असेल. तर तिसऱ्या टप्प्यात प्रवास योजनेचा पूर्ण आराखडा तयार करणे हा त्यांचा उद्देश असणार आहे. चौथ्या टप्पा प्रभावी अंमलबजवणी असेल. काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव सेनेच्या विधानसभा मतदार संघात हा दौरा आखला जाणार आहे. जवळपास 90 मतदार संघ निवडण्यात आले आहेत.  

मागील दहा वर्षाचत ज्या जागा जिंकता आल्या नाहीत, त्यावर भाजप लक्ष केंद्रीत करणार आहे. विधानपरिषद निवडणूकीनंतर राज्यात नाट्यमय घडामोडी घडल्या आणि राज्यात शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्त्वात आले. असे असताना आता भाजपने संपूर्ण महाराष्ट्रातील लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत यश मिळवण्याचा निश्चय केला आहे. भाजपकडून आगामी विधानसभेसाठी मिशन ९८ ची घोषणा केली आहे. या ९८ जागा अशा आहेत की गेल्या दहा वर्षात भाजपला या जागा जिंकता आल्या नाहीत. अशा जागा निवडून आणण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.

विषेश म्हणजे या जागांवर यश खेचून आणण्यासाठी त्या अनुषंगाने रणनीती आखण्यात आली आहे. या जागांवर विजयी होण्यासाठी भाजपने आमदार श्रीकांत भारतीय यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. हे मिशन फत्ते करण्यासाठी पाच ते सहा मतदारसंघामागे एका मंत्र्यांकडे ही जबाबदारी दिली जाणारआहे. सध्या जरी राज्यात शिंदे-भाजप सरकार सत्तेत असलं तरी, आगामी काळात भाजपने या मिशनच्या माध्यमातून स्वबळावर सत्ता आणण्याचा प्रयत्नातही सुरु केला आहे. यासाठी भाजपने ही रणनीती आखल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

महाराष्ट्रात भाजपने स्वबळावर सत्ता स्थापनाचा निर्धार केला आहे. लोकसभेसाठी भाजपने मिशन ४५ प्लसची घोषणा केली आहे. इथेही ज्या जागांवर भाजपला यश मिळवता आले नव्हते अशी लोकसभेच्या सोळा जागा निवडण्यात आल्या आहेत. तर विधानसभेसाठी पश्चिम महाराष्ट्र सांगली, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि आणि मराठवाड्यातील नांदेड या जिल्ह्यांमध्ये भाजपने पूर्ण ताकदीने मैदानात उतरण्याची तयारी सुरु केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in