BJP Mission 45 : भाजपचे मिशन 45, मग शिंदे गटाच्या वाट्याला काय?

भाजपचे नेते लोकसभा निवडणूक शिंदे गटासोबत एकत्र लढणार असे सांगत असले तरी शिंदे गटाला किती जागा सोडणार हे मात्र अद्याप ठरलेले नाही.
CM Eknath Shinde| Devendra Fadanvis
CM Eknath Shinde| Devendra Fadanvis

BJP Mission 45 : लोकसभा निकडणुकीसाठी भाजपने महाराष्ट्रात मिशन 45 चे टार्गेट ठेवले असले तरी भाजप शिंदे गटाला किती जागा सोडणार हे अद्याप निश्चित झालेले नाही.. शिवसेनेचे १३ खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेबरोबर (Eknath Shinde) आहेत. भाजपचे (BJP) नेते लोकसभा निवडणूक शिंदे गटासोबत एकत्र लढणार असे सांगत असले तरी शिंदे गटाला किती जागा सोडणार हे मात्र अद्याप ठरलेले नाही.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे शिंदे यांच्याबरोबर १३ खासदार असले तरी त्यांना पुन्हा उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा असली तरी भाजपने तशी घोषणा केलेली नाही. त्यामुळे शिंदे गटाच्या खासदारांचे काय होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र यादव यांचा बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा दौरा हा भाजपच्या मिशन 45 चाच एक भाग आहे.

CM Eknath Shinde| Devendra Fadanvis
Congress News : कॉंग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांचा प्रताप; सरकारी तिजोरीतून मुलाच्या लग्नासाठी खर्च?

असे आहे भाजपचे लक्ष ?

भाजपने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली असून महाराष्ट्रात शिंदे गटासोबत युतीत लढून ४५ जागा जिंकण्याचे उदिष्ट ठेवले आहे. तर विधान सभेसाठी २०० हून अधिक जागा जिंकण्याचे उदिष्ट आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा सोमवारी (०२ डिसेंबर) महाराष्ट्रात चंद्रपूर व औरंगाबाद येथे आले होते. त्यांनी संघटनात्मक बैठका व सभाही घेतल्या. 2024 च्या लोकसभा निवडणुकीची भाजपने जय्यत तयारी सुरू आहे. वेगवेगळ्या स्तरावर मतदारसंघांच्या माध्यमातून भाजपने महाराष्ट्रात मिशन 45 सुरू केले आहे.

2014 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला संपूर्ण राज्यात सत्ता मिळवायची आहे. त्यासाठी त्यांनी 2019च्या लोकसभेत पराभूत झालेल्या 144 लोकसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केलं आहे. त्यापैकी महाराष्ट्रातले 16 लोकसभा मतदारसंघांमधील 48 पैकी 45 लोकसभेच्या जागा जिंकायच्या आहेत आणि हेच भाजपचं मिशन 45 आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in