BJP Mission 150: मुंबई महापालिकेसाठी भाजपचे 'मिशन 150'; असा आहे मेगाप्लॅन

मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप (BJP) आणि शिंदे गटाने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
BMC | BJP Mission 150:
BMC | BJP Mission 150:Sarkarnama News

BJP Mission For BMC Election: गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या गोटातील हालचालींना वेग आला आहे. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. पण त्याचवेळी भाजपने आगामी मुंबई महापालिकांसाठीही 'मिशन १५०' ची तयारी सुरु केली आहे. खरंतर, महापालिका निवडणुका अद्याप घोषित झालेल्या नाहीत. असे असतानाही भाजपच्या या मेगाप्लॅनची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप (BJP) आणि शिंदे गटाने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे नेते मुंबईच्या प्रत्येक वार्डात जाऊन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची पोलखोल करणार असल्याची चर्चा आहे. तर ठाकरे गटही त्यांचा 'सामना' करण्यास सज्ज झाला आहे.

BMC | BJP Mission 150:
Gulabrao Patil News : गुलाबराव पाटील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला म्हणतात...'हे नौटंकी आंदोलन'

महापालिका निवडणुकांसाठी भाजपने मुंबईतील खासदार आणि आमदारांकडे 'मिशन १५०' ची विशेष जबाबदारी दिली आहे. दररोज पंधराशे लोकांपर्यंत पोहचण्याचे भाजपने लक्ष्य ठेवले आहे. महाविकास आघाडी सरकारने कोविड काळातील भ्रष्टाचार आणि महापालिकेतल्या सत्ताधाऱ्यांचा कारभार भाजप चव्हाट्यावर आणण्याचाही इशारा दिला आहे. त्यामुळे आता ठाकरे गट भाजपच्या या रणनीतीची सामना कसा करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई प्रदेश भाजप कार्यकारणी बैठक झाली. या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र भाजपा चंद्रशेखर बावनकुळे, पूनम महाजन, आशिष शेलार, यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले आणि सूचना दिल्या. या बैठकीनंतर भाजपच्या मिशन 150 ला सुरुवात झाल्याचं बोललं जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com