ज्या शिवसेनेचे बोट धरून राज्यात वाढले, त्याच पक्षाला संपवण्याचा भाजपचा डाव

राज्यातील राजकीय घडामोडींवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले ( Nana Patole ) यांनी मत मांडले.
Nana Patole
Nana PatoleSarkarnama

मुंबई - राज्यातील राजकीय घडामोडींवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले ( Nana Patole ) यांनी मत मांडले. त्यांनी शिवसेनेतील फुटीला भाजप जबाबदार असल्याचे सांगताना ज्या शिवसेनेचे बोट धरून राज्यात वाढले, त्याच शिवसेनेला संपवण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला. ( BJP's instinct to end the same party which grew in the state by holding the finger of Shiv Sena )

नाना पटोले म्हणाले, ज्या शिवसेनेचे बोट धरून महाराष्ट्रात भाजप वाढली, त्याच शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. संविधान आणि लोकशाही पायदळी तुडवून केंद्रातील मोदी सरकार कारभार करत आहे. अंमलबजावणी संचालनालय ( ईडी ), सीबीआय, इन्कम टॅक्स या सहकाऱ्यांच्या मदतीने महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नात आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

Nana Patole
video : नाना पटोले यांनी राजीनामा द्यावा - आशिष देशमुख

ते पुढे म्हणाले की, सत्तापिपासू भारतीय जनता पक्षाला नैतिकता राहिली नाही. कोणत्याही मार्गाने सत्ता हस्तगत करणे हा एकमेव उद्देश आहे. सर्वसामान्य जनता त्यांचे प्रश्न यांच्याशी भाजपला काहीही देणे-घेणे नाही. सत्तेच्या आसुरी महत्वाकांक्षेपायी भाजपने देशाचे वाट्टोळे करायला सुरवात केली आहे, असा आरोपही त्यांनी केला.

ज्या ज्या मित्रपक्षांचा हात धरून भाजप वाढला आहे. त्याच पक्षांना संपवण्याचे काम भाजपने केले आहे. बहुजन समाज पार्टी, लोकजन शक्ती पक्ष, मुकेश साहनी यांचा व्हीआयपी पक्ष यासारख्या अनेक मित्रपक्षांना संपवले. अरुणाचल प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक नंतर आता महाराष्ट्रातही त्यांनी ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्सचा वापर करून महाविकास आघाडी सरकार अस्थिर करून शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न चालवला आहे. मात्र काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीसोबत खंबीरपणे उभा आहे, असे त्यांनी सांगितले.

Nana Patole
नाना पटोले म्हणाले, हा जागतिक पातळीवर भारताला टार्गेट करण्याचा प्रयत्न !

पीडीपी सारख्या पक्षासोबत युती करून सत्तेची फळे खाणारा भारतीय जनता पक्ष आता इतरांना हिंदुत्वाचे सर्टीफिकेट वाटतो आहे. हा मोठा विनोद आहे. भाजपला हिंदू आणि हिंदुत्वाचे काही देणे घेणे नसून त्यांना फक्त सत्ता आणि सत्तेतून मिळणाऱ्या मलिद्याचा हव्यास आहे. भाजपने रामाच्या नावाने गोरगरीब जनतेकडून पैसा जमा केला आणि त्याचा हिशोब अद्याप दिला नाही. भाजपच्या मुखात रामाचे नाव असले तरी त्यांच्या मनात मात्र सत्तापिपासू राक्षसी वृत्तीच आहे हे पुन्हा एकदा दिसून आले आहे, असे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com