भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली अजित पवारांची भेट!

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अजितदादांच्या भेटीला येण्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
Chandrasekhar Bavankule News, Vidhan Parishad Election 2022 News
Chandrasekhar Bavankule News, Vidhan Parishad Election 2022 News Sarkarnama

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे (BJP) वरिष्ठ नेते आणि माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bavankule) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची त्यांच्या दालनात जाऊन भेट घेतली. विधान परिषदेसाठी मतदान सुरू असताना बावनकुळे यांनी ही भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. नेमका कोणता निरोप घेऊन ते आले होते की निरोप द्यायला आले होते, अशी चर्चा विधीमंडळ आवरात रंगली होती. (BJP's Chandrasekhar Bavankule meet Ajit Pawar)

दरम्यान, अजितदादांसोबतची आपली भेटी ही राजकीय नव्हती. तर ती मतदारसंघातील कामांसदर्भात होती, असे स्पष्टीकरण आमदार बावनकुळे यांनी भेटीबाबत दिले आहे. मात्र, त्यांच्या या अचानक भेटीमुळे राजकीय संभ्रम मात्र निर्माण झाला आहे. (Chandrasekhar Bavankule News)

Chandrasekhar Bavankule News, Vidhan Parishad Election 2022 News
नाराज दिलीप मोहिते अजितदादांच्या भेटीला; मतदानाबाबत केले सूचक वक्तव्य!

सध्या विधान परिषदेसाठी अटीतटीची निवडणूक सुरू आहे. एकेक मतासाठी दोन्ही बाजूकडून ओढाओढ सुरू असताना बावनकुळे अचानक अजित पवार यांच्या भेटीसाठी आले होते. बावनकुळे हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील म्हणून ओळखले जातात. त्यांच्या अजितदादांच्या भेटीला येण्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

Chandrasekhar Bavankule News, Vidhan Parishad Election 2022 News
"माझे सासरे नक्की निवडून येतील ; भाजप आमदाराचा राष्ट्रवादीच्या उमेदवाराबाबत विश्वास

एकीकडे फोडफोडीच्या राजकारणाला ऊत आलेला असताना अशा भेटीमुळे राजकीय वातावरण आणखी गरम होते. त्यातून वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रसाद लाड यांचा मार्ग कठीण दिसत असल्याने त्यांच्यासाठी काही निरोप घेऊन चंद्रशेखर बावनकुळे अजितदादांच्या भेटीला आले नव्हते ना, अशीही चर्चा या भेटीनंतर रंगली आहे. अजितदादांच्या दालनात उपस्थित असलेल्या एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्याशीही आमदार बावनकुळे यांनी चर्चा केली.

Chandrasekhar Bavankule News, Vidhan Parishad Election 2022 News
दिलीप मोहितेंचा रूसवा जाईना; ‘त्या’ दोन नेत्यांना भेटून मतदानाचा निर्णय घेणार

दरम्यान, मी अजितदादांना माझ्या नागपूर मतदारसंघातील कामाबाबत भेटलो आहे. या भेटीत कोणताही राजकीय निरोप किंवा हेतू नव्हत, असे स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळे यांनी या भेटीवर बोलताना दिले. भाजपचे उमेदवार राज्यसभेच्या मतांपेक्षा जादा मते घेऊन विजयी होतील, असा दावाही बावनकुळे यांनी या वेळी बोलताना केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com