आमदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ भाजपचे साताऱ्यात आंदोलन...
BJP's agitation in Satara to protest the suspension of MLAs ...

आमदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ भाजपचे साताऱ्यात आंदोलन...

ठाकरे सरकारने भाजपच्या १२ आमदारांना एक वर्षांसाठी निलंबित केले आहे. हा लोकशाहीचा खून असून ठाकरे सरकारने लोकशाहीची मुल्ये पायदळी तुडविण्याचे धोरण सातत्याने राबवित आहे.

सातारा : शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या 'महावसुली' आघाडी राज्य सरकारने तालिबानी पद्धतीने, लोकशाही मूल्ये पायदळी तुडवून भाजपच्या 12 आमदारांचे एक वर्षभरासाठी निलंबन केले. याच्या निषेधार्थ सातारा जिल्हा भाजपच्यावतीने सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निर्दशने करण्यात आली. तसेच निलंबन मागे घेण्याचे निवेदन देण्यात आले. याची प्रत राज्यपाल, मुख्यमंत्री यांना पाठवण्यात आली. BJP's agitation in Satara to protest the suspension of MLAs ...

विधानसभेच्या अधिवेशनात काल गोंधळाचे खोटे निमित्त करून ठाकरे सरकारने भाजपच्या १२ आमदारांना एक वर्षांसाठी निलंबित केले आहे. हा लोकशाहीचा खून असून ठाकरे सरकारने लोकशाहीची मुल्ये पायदळी तुडविण्याचे धोरण सातत्याने राबवित आहे. लोकशाहीचा मुडदा पाडणाऱ्या ठाकरे सरकारचा आम्ही निषेध करतो, अशी शब्दात जिल्हा भाजपच्यावतीने ठाकरे सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी ठाकरे सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. 

या आंदोलनात भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सौ. सुवर्णाताई पाटील, सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, सातारा तालुका अध्यक्ष राजेंद्र इंगळे, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल, बलशेटवार, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, ॲड प्रशांत खामकर, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौ. मनीषाताई पांडे, वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष डॉ. रेपाळ, व्यापारी आघाडीचे अध्यक्ष डॉ. सचिन साळुंखे, आदी  उपस्थित होते. 

यावेळी सरचिटणीस मनीष महाडवाले, भटके विमुक्त आघाडी प्रदेश सदस्य सौ. प्रिया नाईक, नगरसेविका सौ. प्राची शहाणे, प्रवीण शहाणे, गणेश पालखे, चंदन घोडके, प्रशांत जोशी, महिला मोर्चा शहराध्यक्षा सौ. रीना भणगे, ओ बी सी मोर्चा जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे, सिने कलाकार आघाडी जिल्हाध्यक्ष विकास बनकर, सातारा शहर चिटणीस रवींद्र आपटे, महिला मोर्चा शहर उपाध्यक्ष नेहा खैर, सरला घोडके, विक्रम बोराटे, कृणाल मोरे, युवती आघाडी सातारा शहराध्यक्ष दीपिका झाड, तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

No stories found.