
Mumbai Politics: भाजप खासदार डी अरविंद यांनी दोन दिवसांपूर्वी " ईव्हीएमवर तुम्ही कोणतेही बटण दाबा, वोट भाजपालाच जाणार, येणार तर मोदीजीच" असं धडधडीत वक्तव्य केलं होतं. त्यावरून आता राजकारण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनातून आज यावर पहिला वार करण्यात आला आहे. सामनातील 'घोटाळ्यावर शिक्का' या अग्रलेखातून भाजपने ईव्हीएम मशीन हॅक करून निवडणुका जिंकल्याचा आरोप करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर, सत्ताधारी पक्षाने निवडणूक आयोगही हॅक केल्याचा टोला लगावला आहे.
तुम्ही सत्य कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी ते लाव्हासारखे बाहेर येते. मतदारांनो, तुम्ही कोणतेही बटण दाबा, मत भाजपलाच जाईल, असे भाजप खासदार डी अरविंद यांनी म्हटले आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की भाजप ईव्हीएम हॅक करून निवडणुका जिंकतो.असा आरोप सामनातून ठाकरे गटाने केला आहे. इतकेच नव्हे तर, निवडणूक आयोगही भाजपसाठी काम करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत 'निवडणूक आयोगही आता निष्पक्ष राहिले नाही
निवडणूक आयोगात ‘गुजरात मॉडेल’चे अधिकारी आणून त्यांच्याकडून हवी ती बरी-वाईट कामे करून घेतली जातात. महाराष्ट्रात ज्या प्रकारे शिवसेना व धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाच्या हातात दिले, त्यामुळे या मनमानीवर शिक्कामोर्तब झाले. अशी सडेतोड टीकाही ठाकरे गटाने केली आहे. भाजप ईव्हीएमवर प्रेम दाखवत आहे पण ईव्हीएममध्येही छेडछाड होऊ शकते, याचा पुरावा भाजपने दिला, याकडेही ठाकरे गटाने लक्ष वेधले आहे.
भाजप नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी तर ‘ईव्हीएम’ घोटाळय़ावर एक ग्रंथ लिहून ‘ईव्हीएम’विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण २०१४ नंतर ‘ईव्हीएम है तो मोदी ही आयेगा’ यावर मोहोर उठवून देशभरातील अंधभक्तांनी ‘ईव्हीएम चालिसा’चे पठण सुरू केले. जगातील अमेरिका, युरोप, जपान, जर्मनी, बांगलादेश, फ्रान्ससारख्या राष्ट्रांनी निवडणूक प्रक्रियेतून ‘ईव्हीएम’ पद्धत मोडीत काढली. ‘ईव्हीएम’ विश्वासार्ह व समाधानकारक नाही हे सिद्ध झाल्यावरच हा निर्णय घेतला, पण विश्वासार्ह नसलेल्या ‘ईव्हीएम’ जनतेचा विश्वास गमावलेल्या मोदी सरकारने सुरूच ठेवला. हेच खरे गौडबंगाल आहे व हा भंगार माल का वापरला जातोय ते भाजपचेच खासदार डी. अरविंद यांनी आता स्पष्ट केले. असंही त्यांनी सांगितलं.
Edited By- Anuradha Dhawade
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.