भाजप आणखी एक डाव टाकण्याच्या तयारीत; थेट शिवसेनेची 'ही' मोहिमच करणार हाॅयजॅक

Shivsena-BJP Politics| हे सर्व सुरु असताना दूसरीकडे भाजपने मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी तयारी सुरु केली आहे.
Uddhav Thackeray| Devendra Fadanvis
Uddhav Thackeray| Devendra Fadanvis

मुंबई : शिवसेना फोडण्याचा डाव यशस्वी झाल्यानंतर आता भाजपने पुन्हा मोठी मोहिम आखल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेने ‘गाव तेथे शाखा’ ही मोहीम राबवली होती. आता भाजप सुद्धा गाव तिथे शाखा मोहीम राबवणार असल्याचे समोर आले आहे. म्हणजेच आता भाजपने शिवसेनेच्या ही मोहिमसुद्धा हायजॅक करण्याची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी भाजप सरकारने आता आपला मोर्चा शिवसेनेच्या शाखांकडे वळवला आहे.

गाव तिथे शाखा या शिवसेनेच्या मोहिमेच्या माध्यमातून एकेकाळी शिवसेनेने तुफान यशाचे शिखर गाठले होते. पण आता भाजपनेही शिवसेनेच्या या यशाचा कित्ता गिरवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काळात भाजपने महाराष्ट्रातील प्रत्येक गावात किमान दोन शाखा सुरू करण्याचा निर्धार केला आहे. युवकांनी राजकारणाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा, असा या मोहिमेमागचा उद्देश आहे.

Uddhav Thackeray| Devendra Fadanvis
Jalgaon Politics| 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर गुलाबराव पाटलांनी स्पष्टीकरण ; म्हणाले...

इतकेच नव्हे तर गावातील युवकांना आकर्षित करुन गाव आणि शहरातील प्रत्येक घरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या योजनांचा तपशील पोहोचवण्याचे काम या शाखांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. राष्ट्रउभारणीसाठी युवकांना जोडणे हा शाखेचा प्रमुख उद्देश असणार आहे. यासाठीही भाजपने नियोजनाची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती आहे.

एकीककडे हे सर्व सुरु असताना दूसरीकडे भाजपने मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी (BMC Election) फक्त भाजपसोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनीही कंबर कसली आहे. मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी शिंदे गटाच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यात मुंबईसाठी पाच विभागप्रमुख आणि तीन विभाग संघटक असे दोन भाग करण्यात आले असून त्यांच्याकडे पक्ष बांधणीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in