Karnataka Assembly Elections : भाजपचं ठरलं ; अमित शाह यांची मोठी घोषणा

Karnataka Assembly Elections : सात राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसला सहा राज्यात पराभव स्विकारावा लागला आहे.
Amit Shaha
Amit ShahaSarkarnama

Amit Shah : या नवीन वर्षाध्ये ९ राज्यांत (मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, कर्नाटक, तेलंगण, त्रिपुरा, मेघालय, नगालँड व मिझोराम) निवडणुका आहेत. यात जम्मू-काश्मीरला जोडल्यास आकडा १० होतो. या निवडणुकांसाठी भाजपने (bjp)या निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. पण भाजपचा मार्गही सोपा नसला तरी २०२३ हे वर्ष भाजपसाठीही खास वर्ष आहे. कारण त्यांना ५ राज्यांत सरकार वाचवायचे आहे.

आगामी मे महिन्यात कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणूक (Karnataka Assembly Elections) होण्याची शक्यता आहे. कर्नाटकमध्ये भाजप जेडी (एस)सोबत युती करणार अशी चर्चा काही महिन्यापासून सुरु आहे.या चर्चेला भाजपचे नेते, केंद्रीयमंत्री अमित शाह यांनी पूर्णविराम दिला आहे. ते बंगळुरूमध्ये आयोजित एका जाहीर सभेत बोलत होते.

Amit Shaha
Bharat Jodo Yatra : राहुल गांधी नेहमीच टी-शर्ट परिधान करतात, कारण..

“आम्ही सत्तेचा वापर लोकांचे जीवनमान उंचावण्याठी करतो. जनतेच्या भल्यासाठी करतो. काँग्रेसला सत्ता केवळ भ्रष्टाचार करण्यासाठी हवी आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच झालेल्या सात राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसला सहा राज्यात पराभव स्विकारावा लागला आहे”, असा टोला त्यांनी लगावला.

Amit Shaha
Raksha Khadse : राष्ट्रवादीचे नेते खडसेंच्या मदतीला भाजप खासदार आल्या धावून..!

कर्नाटकमध्ये जेडी (एस)सोबतच्या युतीची चर्चा अमित शाह यांनी फेटाळून लावली आहे. ते म्हणाले, “जेडी(एस)ला मत देणं म्हणजे काँग्रेसला मत देणं आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक भाजपा स्वबळावर लढवणार आहे. कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी सज्ज राहावं. काही लोकांकडून जेडी(एस) आणि भाजपाची युती होणार असल्याची अफवा परसवली जात आहे," असे शाह म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com