Eknath Shinde not reachable, Political Crisis in Maharashtra,
Eknath Shinde not reachable, Political Crisis in Maharashtra,

एकनाथ शिंदे नॉटरिचेबल झाल्यानंतर भाजपने स्पष्ट केली आपली भूमिका

Eknath Shinde not reachable| रात्रीपासून मंत्री एकनाथ शिंदे नॉटरिचेबल आहेत.

मुंबई : विधान परिषदेच्या (Maharashtra) निकालानंतर राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह जवळपास 17 आमदार नॉटरिचेबल आहेत. हे सर्व आमदार गुजरामधील सुरतमध्ये एका हॉटेलमध्ये असल्याची माहिती जवळपास निश्चित झाली आहे. ही घटना म्हणजे महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. (Eknath Shinde latest News)

या घडामोडींवर प्रतिक्रीया दिली आहे. ''भाजपचा या घडामोडींशी संबंध नाही, पण सध्या आम्ही या घडामोडींवर लक्ष ठेवून आहोत. भाजप दुपारी दोन नंतर आपली भूमिका स्पष्ट करेल. अशी भुमिका भाजप नेते केशव उपाध्ये यांनी स्पष्ट केली आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील आज सकाळीच दिल्लीला रवाना झाले आहेत.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत अब्दुल सत्तार, संजय शिरसाट, संदीपान भुमरे, शहाजी पाटील, तानाजी सावंत, प्रकाश आबिटकर, शंभुराज देसाई, किशोर पाटील, दादा भुसे, शंभूराजे देसाई, अब्दुल सत्तार, संजय सिरसाट, संदीपान भुमरे, शहाजी पाटील, तानाजी सावंत, प्रकाश आबिटकर, ज्ञानराज चौगुले इ. नेते असल्याचे बोलले जात आहे. (Political Crisis in Maharashtra)

मंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून नाराजीनाट्य सुरू होते. आमदार संजय राठोड यांनाही पुन्हा मंत्रीमंडळात संधी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांना केवळ आश्वासन मिळत आहे. त्यामुळे आमदार राठोड नाराज होते. राठोड हे एकनाथ शिंदे यांच्या जवळचे मानले जातात. शिवसेनेचे नेते गायब झाल्याने नवीन राजकीय समीकरण जुळून येण्याची चिन्हे आहेत. या धक्कातंत्राने भारतीय जनता पक्ष आपल्या सत्ता स्थापन करण्याच्या हेतूत यशस्वी होऊ शकते, अशीही चर्चा रंगली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com