भाजप करणार महाविकास आघाडीची रस्त्यावर कोंडी

नवाब मलिक ( Nawab Malik ) यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांच्यासह भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama

मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीवर डोळा ठेवून भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक ( Nawab Malik ) यांच्या सह महाविकास आघाडीला लक्ष्य केले असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित जमिनीचा व्यवहार आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात मलिक अडचणीत आले आहेत. ते सध्या सक्तवसुली संचलनालयाच्या (ED) कोठडीत आहेत. अशावेळी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांच्यासह भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. ( BJP will block Mahavikas Aghadi on the road )

अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचा राजीनामा हेच आमचे उद्दिष्ट असून आम्ही रस्त्यावरील लढाई तर लढूच पण सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला मलिक यांचा राजीनामा घ्यायला भाग पाडू, असे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज ( शनिवारी ) म्हणाले. त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजप बुधवारी (ता. 9) मोर्चा काढणार आहे. अर्थसंकल्पी अधिवेशनात मलिकांच्या राजीनाम्याची मागणी भाजपने लावून धरली आहे. त्यानंतर आता या मागणीसाठी भाजप रस्त्यावर उतरणार आहे.

Devendra Fadnavis
नवाब मलिक यांच्यानंतर त्यांच्या मुलाला ईडीचा दणका

भाजपच्या आक्रमक रणनीतीमागे मुंबई महापालिका निवडणुकीचे कारण दडले असल्याचे बोलले जाते. या रणनितीमुळे मुंबई महापालिकेत शिवसेनेकडून सत्ता खेचता येईल,अशी भाजपने अटकळ बांधली आहे. त्यामुळेच भाजप मलिक यांच्या राजीनाम्यावरून आक्रमक झाली आहे.

राज्यभरात भाजपकडून नवाब मलिक यांच्या राजीनाम्याचे आंदोलन सत्र सुरू आहे. ही रस्त्यावरील आंदोलने महाविकास आघाडीची कोंडी करतील असे भाजपचे नेते सांगत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in