Bjp Vs Balasahebanchi Shivsena : ठाण्यात भाजप- शिंदे गटातला वाद पेटला; परस्परविरोधी गुन्हे दाखल

Bjp Vs Balasahebanchi Shivsena : भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेनेत फलक बसवण्यावरून वाद
Bjp, Balasahebanchi Shivsena latest news, Uddhav Thackeray, Eknath Shinde
Bjp, Balasahebanchi Shivsena latest news, Uddhav Thackeray, Eknath Shinde Sarkarnama

Bjp Vs Balasahebanchi Shivsena : राज्यात शिंदे गट आणि भाजपा यांची युती सत्तेच्या खुर्चीवर गुण्यागोविंदाने एकत्र नांदत आहे. मात्र, असे असतानाच मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात शिंदे गट आणि भाजपमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. यामध्ये दोन्ही बाजूने गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोप प्रत्यारोपांनी हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे निकटवर्तीय म्हणून विकास रेपाळे यांची ओळख आहे. ते बाळासाहेबांची शिवसेना गटाचे माजी नगरसेवक देखील आहे. मात्र, बाळासाहेबांची शिवसेना गटाचे माजी नगरसेवक रेपाळे यांच्यासह तब्बल दहा जणांवर भाजप पदाधिकारी प्रशांत जाधव यांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचदरम्यान, आता शिंदे गटाच्या माजी महिला नगरसेविकेनं भाजपच्या प्रशांत जाधवांविरोधात विनयभंगाची तक्रार दिल्यानंतर आता वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

भाजप (Bjp) आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षात फलक बसविणाऱ्यावरून शुक्रवारी वाद झाला होता. यानंतर पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना समज दिली होती. त्यानंतर अचानक १५ ते २० जणांच्या जमावानं प्रशांत जाधव यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या घटनेत त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली असून त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, शनिवारी सकाळी त्यांची स्थिती बिघडल्याने त्यांना मुंबईतील जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.

काय आहे प्रकरण?

ठाण्यातील परबवाडी येथील कशिश पार्कमध्ये प्रशांत जाधव यांच्याकडून त्यांच्या वाढदिवसाचे फलक बसविण्यात आले होते. या फलकामुळे इमारतीला नुकसान होत होते. यावरुन माजी नगरसेविका आणि संकुलातील एक महिलेनं त्यांना हटकलं असता प्रशांत यांनी त्यांचा अश्लील भाषेत शिवीगाळ आणि धक्काबुक्की करून विनयभंग केला. याप्रकरणी प्रशांत यांच्या वडिलांसह आणखी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, शुक्रवारी रात्रीपासूनच भाजपच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi Shivsena) या पक्षाचे माजी नगरसेवक विकास रेपाळे आणि शिंदे गटाच्या एका माजी महिला नगरसेविकेच्या सांगण्यावरून झाल्याचा आरोप केला होता. तसं ट्विटही भाजप ठाणे या खात्यावरून करण्यात आलं होतं. यानंतर भाजप आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांनी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात ठिय्या मांडल्यानंतर शनिवारी रात्री उशिरा याप्रकरणी विकास रेपाळे यांच्यासह १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानंतर शिंदे गटाच्या माजी नगरसेविकेने प्रशांत जाधव यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली. त्याआधारे प्रशांत जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in