विधान परिषदेसाठी भाजपकडून सहावा उमेदवार म्हणून सदाभाऊ खोतांना संधी..

खोत मुंबईच्या दिशेने रवाना झाले असून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत ते अर्ज भरणार आहेत.
sadabhau khot
sadabhau khot sarkarnama

मुंबई : सध्या राज्यसभा निवडणुकीसाठी मतांच्या जुळवाजुळवीसाठी राजकीय पक्षांमध्ये प्रचंड चुरस दिसत आहे. ही निवडणूक आटोपल्यानंतर अवघ्या १० दिवसांत विधानपरिषदेची (bjp vidhan parishad election) निवडणूक आहे. भाजपने काल पाच उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.

भाजपकडून विधान परिषदेसाठी सहावा उमेदवार म्हणून सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. रयतक्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांना भाजपकडून बोलावण्यात आलं आहे.

सदाभाऊ खोत हे आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. खोत मुंबईच्या दिशेने रवाना झाले असून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत ते अर्ज भरणार आहेत. आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.

sadabhau khot
मोठी बातमी : भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी उद्धव ठाकरेंसह पाच पक्षप्रमुखांना समन्स

भाजपने काल विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पाच उमेदवारांची घोषणा केली आहे. यात प्रविण दरेकर आणि प्रसाद लाड (Prasad Lad) या विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) यांचे विधानसभेतील पराभवानंतर विधानपरिषदेवर पुनर्वसन करण्यात आले आहे.

याशिवाय श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे यांच्या नावाची घोषणा केली आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणुक कार्यालयाकडून बुधवारी महाराष्ट्रातील पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

भाजपकडे हक्काची ११३ मते आहेत. त्यामुळे २७ मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी महाविकास आघाडीला समर्थन असलेल्या २२ मतांची बेगमी करावी लागणार आहे. तर काँग्रेसची ४४ मते असून २७ मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या उमेदवाराला १० मतांची भासणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com