विधानपरिषद निवडणूक : भाजपचे ४ उमेदवार विजयी झाल्यास पराभूत होणारा पाचवा चेहरा कोणाचा?

BJP | Vidhanparishad | : संख्याबळानुसार भाजपचे ४ उमेदवार निवडून येवू शकतात.
Ram Shinde | Pravin Darekar | Prasad Lad| Shrikant Bharatiy | uma khapre
Ram Shinde | Pravin Darekar | Prasad Lad| Shrikant Bharatiy | uma khapreSarkarnama

मुंबई : भाजपने आज विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पाच उमेदवारांची घोषणा केली आहे. यात प्रविण दरेकर आणि प्रसाद लाड (Prasad Lad) या विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) यांचे विधानसभेतील पराभवानंतर विधानपरिषदेवर पुनर्वसन करण्यात आले आहे. याशिवाय श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे या नव्या चेहऱ्यांनाही विधान परिषदेची लॉटरी लागली आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणुक कार्यालयाकडून बुधवारी महाराष्ट्रातील पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

भाजपने आज या सर्वांचे उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यानंतर बोलताना आमचे पाचही उमेदवार विजयी होतील असा दावा भाजपकडून करण्यात आला. मात्र यानंतर राजकीय वर्तुळात पराभूत होणारा भाजपचा तो पाचवा चेहरा कोण असणार याची चर्चा रंगली आहे.

विधान परिषदेसाठी २० जूनला निवडणूक होणार आहे. विधान परिषदेवर निवडून यायचे असेल तर २७ मतांची आवश्यकता असणार आहे. सध्या विधानसभेत भाजपचे १०६ तर पाठिंबा दिलेले ४ अपक्ष आणि २ मित्रपक्ष मिळून संख्याबळ ११२ होते. या संख्याबळानुसार भाजपचे २७*४ = १०८ म्हणजे ४ उमेदवार सहज निवडून येवू शकतात. तर उर्वरित ४ मते गृहित धरल्यास आणि भाजपला पाचवी जागा निवडून आणण्यासाठी आणखी २३ मतांची आवश्यकता आहे.

तर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ५३, शिवसेना (Shivsena) ५६ आणि कॉंग्रेसचे (Congress) ४४ आमदार आहेत. याशिवाय ९ अपक्ष आणि मित्रपक्षांचे ११ असे २० आमदारांचे समर्थन आहे. या जवळपास १७३ आमदारांच्या संख्याबळावर महाविकास आघाडीचे ६ उमेदवार सहज निवडून जावू शकतात. त्यामुळे भाजपच्या चारच जागा निवडून आल्यास पराभूत होणारा पाचवा उमेदवार कोण याची चर्चा रंगली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com