मलिकांसह अबू आझमी अन् अस्लम शेख यांच्या मतदारसंघात भाजपची 'फिल्डींग'

मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्याचप्रमाणे 2024 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठीही भाजपने कंबर कसली आहे.
Abu Azmi, Nawab Malik, Aslam shaikh
Abu Azmi, Nawab Malik, Aslam shaikhSarkarnama

मुंबई : मुंबई महापालिकेच्या (BMC) आगामी निवडणुकीसाठी भाजपने (BJP) जोरदार तयारी सुरू केली आहे. त्याचप्रमाणे 2024 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठीही (Assembly Election) भाजपने कंबर कसली आहे. त्यातच भाजपचे नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी ट्विट करत महाविकास आघाडीतील तीन नेत्यांच्या मतदारसंघांबाबत मोठं विधान केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik), काँग्रेसचे नेते पालकमंत्री अस्लम शेख (Aslam Shaikh) व समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी (Abu Azmi) यांच्या मतदारसंघात भाजपनं फिल्डींग लावल्याचे स्पष्ट झालं आहे.

अंमलबजावणी संचालनालयाने (ED) काही दिवसांपूर्वी मलिक यांना अटक केली आहे. सध्या ते आर्थर रोड तुरूंगात आहेत. मोहित कंबोज यांच्याकडून मलिकांना सातत्याने लक्ष्य करण्यात आलं आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर दोन्ही नेत्यांमधील वाद टोकाला पोहचला होता. भाजपने मलिकांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलनही केलं आहे. आता मलिक हे आमदार म्हणूनही निवडून येऊ नयेत, यासाठी भाजपने तयारी सुरू केल्याचे दिसते.

Abu Azmi, Nawab Malik, Aslam shaikh
शशिकला यांना उच्च न्यायालयाचा झटका; पक्षात परतण्याच्या प्रयत्नांना खीळ

मलिक यांचा अणुशक्ती नगर हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून ते पाचवेळा निवडून आले आहेत. कंबोज यांनी सोमवारी ट्विट करत मुंबईतील अणुशक्ती नगर, मालाड आणि मानखुर्द शिवाजी नगर मतदारसंघातून पुढील आमदार जय श्री रामचा नारा देत विधानसभेत पोहचेल, असं कंबोज यांनी म्हटलं आहे. मालाड मतदारसंघातून काँग्रेसचे नेते व पालकमंत्री अस्लम शेख निवडून आले आहेत.

मानखुर्द शिवाजीनगर हा मतदारसंघ अबू आझमी यांचा आहे. कंबोज यांनी आपल्या ट्विटमध्ये तिघांची नावे घेतली नसली तरी मतदारसंघांचे नावं घेत त्यांनी या नेत्यांवर निशाणा साधला आहे. या मतदारसंघातून 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत भाजप जोर लावणार असल्याचे स्पष्ट आहे. 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत मलिक यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला आहे.

आझमी यांच्या मतदारसंघातही शिवसेनेचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होता. तर अस्लम शेख यांच्या मतदारसंघातून भाजपच्या उमेदवाराचा 10 हजार मतांनी पराभव झाला आहे. सध्या महाविकास आघाडीचं सरकार असून आगामी निवडणुकीत तीनही पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तीनही ठिकाणी भाजपचा उमेदवार असणार हे निश्चित आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com