सरकार बरखास्त नाही केलं तर माझं नाव बदला ; मुनगंटीवारांचे आव्हान

एवढी बदमाशी आली आहे का? मी कोर्टात जाईन, सुप्रीम कोर्टात जाईन. हा लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस आहे.
Sudhir Mungantiwar, Uddhav Thackeray

Sudhir Mungantiwar, Uddhav Thackeray

sarkarnama

मुंबई: हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सत्ताधारी अन् विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसले. विद्यापीठ विधेयकावर सरकारने चर्चा करु दिली नाही, असा आरोप भाजपच्या नेत्यांनी केली. यावेळी भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) आक्रमक झाले होते. त्यांनी महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला.

''एवढी बदमाशी आली आहे का? मी कोर्टात जाईन, सुप्रीम कोर्टात जाईन. हा लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस आहे. सरकार बरखास्त नाही केलं तर माझं नाव बदला,'' असा इशारा मुनगंटीवार यांनी यावेळी सभागृहात ठाकरे सरकारला (Uddhav Thackeray)दिला.

''शेवटच्या दिवशी जनतेने सरकारचा खरा चेहरा पाहिला. विद्यापीठ कायद्यात बदल केल्यामुळे तीन कोटी विद्यार्थ्यांवर परिणाम होणार आहे त्या विधेयकाचा प्रस्ताव चर्चेसाठी ठेवला नाही. सरकारने ही घटनाबाह्य कृती केली. देवेंद्र फडणवीस यांना त्यांना मध्ये थांबवले. पण ''मीच बाधेन ते तोरण आणि धोरण'' ही सरकारची कृती पाहिली,''

''मी अनेक सरकार आणि मुख्यमंत्री पाहिले. मुख्यमंत्री नसणारे हे पहिले अधिवेशन झाले. हा इतिहास मुख्यमंत्र्यांनी करून दाखवला. मी 27 वर्ष सभागृहाचा सदस्य आहेत. अनेक मुख्यमंत्री आणि अध्यक्ष मी पाहिले. मात्र या मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त मला कामकाजाचा अनुभव मला जास्त आहे,'' असे मुनगंटीवार म्हणाले.

<div class="paragraphs"><p>Sudhir Mungantiwar,&nbsp;Uddhav Thackeray</p></div>
भाजपची अवस्था 'शरीर मांजराचे काळीज उंदराचे' अशीच

''मी आदित्य ठाकरे यांना विनंती केली. विद्यापीठाच्या कायद्यात बदल करताना चिंतन व्हावे ही माझी भूमिका होती. विरोधीपक्ष नेत्याना थांबवून छगन भुजबळ यांनी कामकाज बंद केले. भुजबळ यांना बाळासाहेब ठाकरे यांनी बडतर्फ करा असे सांगितले, मात्र उद्धव ठाकरे यांनी त्यांना खुर्ची दिली मांडीला मांडी लावून बसलेत. आम्ही बहुमताने आलो हे सांगण्याचा या सरकारला अधिकार नाही, हे बेईमानीने आलेलं सरकार आहे, '' असे मुनगंटीवार यांनी सांगितले.

डॉक्टरला कंपाउंडर समजले जाते..

''हरामखोर हा शब्द म्हणजे नॉटी,'' असे म्हटलं जाते, ज्या सरकारमध्ये डॉक्टरला कंपाउंडर समजले जाते, त्या सरकारकडून काय अपेक्षा करणार. राज्याची जनता या सरकारमुळे व्यथित झाली आहे,'' अशी टीका मुनगंटीवार यांनी यावेळी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com