'मनसेच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपने हिंदुत्त्वाचा गळा घोटला'; संजय राऊतांचा आरोप

Sanjay Raut| Raj Thackeray| BJP| भाजपने त्यांच्या राजकारणासाठी राज ठाकरेंचा वापर करुन घेतला
'मनसेच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपने हिंदुत्त्वाचा गळा घोटला'; संजय राऊतांचा आरोप
Sanjay Raut

मुंबई : राज्यातून अहवाल आलेत ज्यांनी लोकांनी भोंग्यांच राजकारण (Politics) केलं, स्पष्टच सांगायचं झालं तर मनसेच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपने महाराष्ट्रात हिंदुत्वाचा गळा घोटला, असा घणाघाती आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पत्रकार परिषदेनंतर संजय राऊत यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

या प्रकरणाचा सर्वाधिक फटका हिंदुंना बसणार आहे. २००५ च्या सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे. पण भाजपने भोंग्यांचा विषयावर मनसेला पुढे आणून चर्चेत आणला आणि गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पण मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांच काय करायचं यासंंदर्भात कायदा आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसारच कारवाई होईल. मशिदींंवरील भोंग्याचा निर्णय वैयक्तिक रित्या घेतला जाऊ शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या वर कोणीही नाही, जर तुम्ही समान नागरी कायदा म्हणत असाल तर सर्वांसाठी एकच कायदा आहे, त्यालाच समान नागरी कायदा बोलले जाते.

Sanjay Raut
'आघाडी सरकारने ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला; भाजप देणार २७ टक्के आरक्षण'

राज ठाकरे बोलले भोंग्यांचा मुद्दा हा सामाजिक विषय आहे, धार्मिक नाही यावर विचारले असता संजय राऊत म्हणाले की, हा सामाजिक नाही तर धार्मिकच वाद आहे.हा हिंदुमध्ये फूट पाडण्याचा वाद आहे. यामागे भाजपचच कारस्थान आहे. भाजपने पुन्हा एकदा राज ठाकरेंचा बळी दिला आहे, हे मी स्पष्ट सांगतो. जी गोष्ट भाजपला जमत नाही ती गोष्ट लहान पक्षांना हाताशी धरुन करत असते, भाजपने त्यांच्या राजकारणासाठी राज ठाकरेंचा वापर करुन घेतला हे आज स्पष्टझालं.

हे आंदोलन ज्यांनी सुरु त्यामुळे आता हिंदूमध्येही जागृती होऊ लागली आहे. उद्या जर हिंदू रस्त्यावर उतरले तर मला आश्चर्य वाटणार नाही. पण मी मुख्यमंत्र्यांच्या वतीने आव्हान करतो की हिंदुंनी संयम राखावा. राज्यात अनेक ठिकाणी सकाळच्या काकड आरती झाली नाही. मनसेमुळे आज हिंदु भाविकांची गैरसोय झाली. अनेक धार्मिक कार्यक्रम रद्द झाले. याबाबत अनेक तक्रारी आल्या आणि याला नवहिंदुत्ववादी आणि नवे ओवेसी जबाबदार आहेत. पण हे भोंगे त्यांच्यावरच उलटणार आहेत. हे इतिहासात घडलं नाही, मात्र भजपामुळे हे घडलं, असंही संजय राऊत यांनी नमुद केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.