समजणे वाले को इशारा काफी है! चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला इशारा

एकनाथ शिंदे यांच्या बंडावरुन चंद्रकांत पाटील यांची शिवसेनेवर टीका
समजणे वाले को इशारा काफी है! चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला इशारा
Chandrakant PatilSarkarnama

मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या कथित बंडखोरीमुळे राज्याच्या राजकीय वातावरणात मोठे वादळ उठले आहे. शिंदेंसोबत इतरही शिवसेनेचे काही आमदार असल्यामुळे राज्य सरकारच्या स्थैर्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर भाजपकडून (BJP) सरकारला लक्ष्य करण्याची संधी साधली जात आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी यासंदर्भात पत्रकार परिषदेत बोलताना शिवसेनेवर व राज्य सरकारवर खोचक शब्दांत टीका केली.

चंद्रकांत पाटील म्हणाले, विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या एका उमेदवाराचा पराभव झाल्यावरुन निशाणा साधला. राज्यसभेला १२३ आमदारांनी भाजपला मतदान केले. विधानपरिषदेला तर १३४ जणांनी भाजपला मतदान केले. याच भितीने अडीच वर्षापासून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक झाली नाही. तुम्ही सरकारमध्ये असून उपयोग काय, असा सवाल पाटील यांनी केला. तुमचा आमदारांवर विश्वास नाही. त्यामुळे भाजपला स्वत:ची ताकद दाखवण्याची एक चांगली संधी मिळाली, असे पाटील म्हणाले. देवेंद्र फडणवीसांचे नेतृत्व काय आहे, त्यांची हुशारी काय आहे हे यानिमित्ताने सिद्ध झाल्याचे पाटील म्हणाले.

Chandrakant Patil
एकनाथ शिंदे अजितदादांपेक्षा वजनदार निघाले; ३५ आमदार घेवून बाहेर पडले...

आत्ता कोणतेही मत व्यक्त करणे घाईचे होईल. त्यामुळे वेट अँड वॉच भूमिका भाजपची आहे. अडीच वर्षापूर्वी जेव्हा हे अशास्त्रीय सरकार निर्माण झाले, तेव्हाच पहिल्या महिन्याभराच्या काळात अनेक आमदारांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जायचे असेल तर आम्हाला तुमच्यासोबत राहायचे नाही, असे सांगितले होते असा दावा पाटील यांनी केला. पण हे त्यांच्या नेतृत्वाचे कौशल्य आहे की त्यांनी उद्याचा वायदा देऊन लोकांना आपल्यासोबत ठेवले. भाजपला हा धडा शिकवण्याचा प्रयत्न आहे, असे सांगून सत्तेत सहभागी व्हायला लावले, असेही पाटील म्हणाले.

Chandrakant Patil
गटनेते पदावरील शिंदेंचा दावा कायम राहणार? संख्याबळ ठरणार सरस

एकनाथ शिंदेच म्हणाले असतील, 'आम्ही पुन्हा येऊ'

एकनाथ शिंदेंनी वेगळी वाट धरण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, त्यात भाजपसोबत कोणतीही पूर्वयोजना नाही. यातून पुढे काय होणार आहे हे सांगण्यासाठी मी ज्योतिषी नाही. या घडामोडींमध्ये कोणताही प्रस्ताव भाजपने शिंदेंना किंवा शिंदेंनी भाजपला दिलेला नाही, असेही पाटील यांनी सांगितले. एकनाथ शिंदेंनी यानिमित्ताने त्यांच्या नेतृत्वाला हा इशारा दिला, असेल की तुम्ही हिंदुत्व सोडणे, असा टोला पाटील यांनी लगावला. तसेच समजणे वाले को इशारा काफी है, असे सूचक विधान त्यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in