भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी प्रदेश कार्यालयात जाताच सांगितलं २०२४ च्या विजयाचं गणित

भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रदेश कार्यालयात जल्लोषात स्वागत करण्यात आले.
Chandrashekhar Bawankule Latest News
Chandrashekhar Bawankule Latest NewsSarkarnama

मुंबई : पावसांच्या धारात, वाद्यांच्या जल्लोषात आणि घोषणांच्या दणदणाटात भारतीय जनता पार्टीचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचे कार्यकर्त्यांनी मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात आज (१७ ऑगस्ट) स्वागत केले. याबरोबर मुंबई भाजपाचे नवनियुक्त अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांचेही कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बोलतांना बावनकुळे व शेलार यांच्या नेतृत्वात आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसोबत भाजप आगामी काळात मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील सर्व निवडणुकीत विजयाचा झेंडा फडकवेल, असा विश्वास व्यक्त केला.

Chandrashekhar Bawankule Latest News
मोदी,शहांकडून गडकरींच्या ` सेंड ऑफ` ची तयारी?

भाजपाचे मावळते प्रदेशाध्यक्ष व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या स्वागत समारंभास महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकारमंत्री अतुल सावे, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री बबनराव लोणीकर, संभाजी पाटील निलंगेकर, हर्षवर्धन पाटील, आमदार राणा जगजितसिंह, नितेश राणे, भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार श्रीकांत भारतीय, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष आमदार उमा खापरे यांच्यासह पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बावनकुळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाला एकविसाव्या शतकात देशाला सर्वोच्च स्थानावर नेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला राज्यातील प्रत्येक बूथवर ५० युवा वॉरिअर्स उभे करायचे आहेत. या २५ लाख युवा वॉरिअर्सच्या जोरावर आगामी २०२४ च्या निवडणुकीमध्ये प्रचंड मोठे यश मिळवायचे आहे. आपल्याला आगामी काळात मुंबई महापालिका जिंकायची आहे. सर्व निवडणुकांमध्ये भाजपाच नंबर वनचा राहील यासाठी मेहनत करायची आहे. यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मिळालेल्या यशाची परंपरा टिकवायची आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याबरोबर भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून पक्षाची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांचे आभारही त्यांनी मानले.

Chandrashekhar Bawankule Latest News
Supriya Sule : ज्यांनी ‘ते’ ट्विट केलं, त्यांनाच तुम्हाला विचारावं लागेल !

चंद्रकांत पाटील यावेळी बोलताना म्हणाले की, बावनकुळे सामान्य पार्श्वभूमीतून पुढे आले आहेत. भाजपाचा अध्यक्ष किंवा मुख्यमंत्री होण्यासाठी घराण्याची पार्श्वभूमी नव्हे तर मेहनत आणि गुणवत्ता आवश्यक असते. पक्षामध्ये नेतृत्वावर विश्वास ठेऊन श्रद्धेने काम करत रहावे याचे बावनकुळे हे उदाहरण आहे. मेहनत घेणारे नेतृत्व राज्याचे अध्यक्ष म्हणून मिळाले आहे.

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक जिंकण्यासाठी पक्षाच्या नेतृत्वाने आशिष शेलार यांच्यावर जबाबदारी दिली असून ते पक्ष नेतृत्वाच्या विश्वासाला पात्र ठरतील, असे मत पाटील यांनी व्यक्त केले. तसेच यावेळी बोलताना आशिष शेलार यांनी मुंबई महानगरपालिकेवर विजयाचा झेंडा लावल्याशिवाय थांबणार नाही, असा निर्धार केला.

Chandrashekhar Bawankule Latest News
केदार दिघेची शिंदेवर टीका : आनंद दिघे हे केवळ तीन-चार जणांत वावरले नाहीत

दरम्यान, भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीमध्ये समावेश झाल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. बावनकुळे यांचे मुंबई विमानतळावर कार्यकर्त्यांनी उत्साहात स्वागत केले. त्यानंतर त्यांनी व शेलार यांनी विमानतळाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मृतीस्थळ, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्मारक, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक आणि चर्चगेट येथील अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा येथे अभिवादन केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com