शिवसेना खासदारांना टेन्शन : भाजपचे दोन वर्षे आधीच मिशन- 2024, प्रभारीपण नेमले

भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीची दोन वर्षे आधीपासूनच तयारी सुरू केली आहे
Devendra Fadanvis| Dehu|
Devendra Fadanvis| Dehu|sarkarnama

मुंबई : भारतीय जनता पक्षाने (BJP Maharashtra) महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघांवर आतापासूनच लक्ष केंद्रीत करण्यास सुरवात केली आहे. त्यासाठीच्या नियोजनाची बैठक माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे आज झाली.

शिवसेनेचे खासदार असेलल्या मतदारसंघांवर विशेष लक्ष देण्याचे नियोजन आज करण्यात आले. यासाठी प्रत्येक केंद्रीय मंत्र्यांना मतदारसंघाची जबाबदारी देण्यात येणार आहे. त्यासाठी मतदारसंघनिहाय प्रभारी आणि सरप्रभारी यांची यादी आज जाहीर करण्यात आली. आगामी लोकसभा निवडणूक भाजप स्वबळावर लढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे पहिल्यांदाच शिवसेनेशिवाय भाजप ही लोकसभेच्या रिंगणात उतरेल. शिवसेनेचे खासदार असलेल्या मतदारसंघांची जाणीवपूर्वक निवड करण्यात आली आहे.

Devendra Fadanvis| Dehu|
अजित पवारांनी भाषण करावे, अशी मोदींची इच्छा होती; पण....

पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे हे या बैठकीला उपस्थित होते. याशिवाय सर्व प्रभारी आणि सहप्रभारी यांनाही मार्गदर्शन करण्यात आले. ज्या ठिकाणी पक्षाचा उमेदवार पराभूत झाला तेथे केंद्रीय मंत्री विशेष लक्ष देणार आहेत. केंद्रीय मंत्र्यांच्या दौऱ्याच्या नियोजनाची जबाबदारी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे देण्यात आली आहे. हे प्रभारी तातडीने दौरे सुरू करणार आहेत.

या बैठकीनंतर बोलताना फडणवीस म्हणाले की आमची तयारी सतत सुरू असते. केंद्राच्या योजनांचा लाभ सर्व लोकांपर्यंत पोहोचला आहे का, पोहोचला असेल त्यात काही अडचणी आहेत का, पक्षाची संघटना मजबूत करणे याचा सारा आढावा हे प्रभारी घेतील. लोकसभा निवडणूक संदर्भात पक्षाचे जे काही कार्यक्रम असतील ते तंतोतंत राबविण्याची जबाबदारी या पदाधिकाऱ्यांवर असेल. केंद्रीय सर्व मतदार संघावर बारीक नजर असून फोलोअप जिल्हाघ्यक्ष यांनी घ्यायचा आहे.

Devendra Fadanvis| Dehu|
मी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणूनच बघतो!

प्रभारींची यादी मतदारसंघनिहाय पुढीलप्रमाणे

बुलढाणा, चंद्रपूर, हिंगोली, औरंगाबाद- अतुल सावे (प्रभारी), आशिष कुलकर्णी (सहप्रभारी)

पालघर, कल्याण, मुंबई दक्षिण, मुंबई दक्षिण मध्य- रवींद्र चव्हाण (प्रभारी), सतिश निकम (सहप्रभारी)

रायगड, बारामती, शिरूर, शिर्डी -सुनील कर्जतकर (प्रभारी), रवींद्र अनासपुरे (सहप्रभारी)

सातारा, रत्नागिरी, सिंधुदर्ग, कोल्हापूर, हातकणंगले -प्रमोद जठार (प्रभारी), सुमंत घैसास (सहप्रभारी)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com