फडणवीसांच्या भूमिकेला भाजपमधूनच छेद; राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला प्रवक्त्यांचाच विरोध

भाजपचे अयोध्येतील खासदार ब्रिजभूषण सिंग यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला कडाडून विरोध केला आहे.
फडणवीसांच्या भूमिकेला भाजपमधूनच छेद; राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला प्रवक्त्यांचाच विरोध
Raj Thackeray News| Devendra fadanvis News | MNS-BJP alliance news | MNS News UpdatesSarkarnama

मुंबई : भाजपचे अयोध्येतील खासदार ब्रिजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला कडाडून विरोध केला आहे. पण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ‘रामाच्या चरणी जो जात असेल त्याला जाऊ द्यावे, विरोध करण्याचे काहीच कारण नाही’ असा सल्ला दिला आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी फडणवीसांच्या या भूमिकेला भाजपमधूनच छेद देण्यात आला आहे. (Raj Thackeray Ayodhya visit Latest Marathi News)

मुंबई भाजपचे प्रवक्ते संजय ठाकूर यांनीच राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला आहे. मनसे कार्येकर्त्यांनी उत्तर भारतीयांना मारहाण केली होती. त्याबद्दल राज ठाकरे यांनी आधी उत्तर भारतीयांची माफी मागावी आणि त्यानंतरच अयोध्येला जावे, असं आवाहन ठाकूर यांनी केले आहे. (BJP Latest Marathi News Update)

राज ठाकरे यांनी माफी मागितली तर मी लखनऊ विमानतळावर येऊन शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह त्यांना सुरक्षित अयोध्येत घेऊन जाणार असंही ठाकूर म्हणाले आहेत. पण राज ठाकरे यांनी माफी मागितली नाही तर त्यांच्या दौऱ्याला आपला विरोध असेल, असं ठाकूर म्हणाले आहेत. ठाकूर यांच्या या भूमिकेमुळे आता भाजपचीही कोंडी झाली आहे.

काय म्हणाले होते फडणवीस?

खासदार सिंह हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध का करत आहे. हे माहिती नाही. माझे त्यांच्याशी बोलणे झालेले नाही. परंतु श्रीराम चरणी जात असेल त्याला जाऊ द्यावं, असं म्हणत फडणवीस यांना राज ठाकरे यांच्या दौऱ्याला पाठिंबा दिला होता.

ब्रिजभूषण सिंह यांची टीका

ब्रिजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. राज ठाकरे हे दबंग नेते नाहीत. त्यांना अयोध्येत यायचे असेल तर आधी उत्तर भारतीयांची माफी मागावी. त्यांनी माफी न मागितल्यास आत्ताच नव्हे तर यापुढेही उत्तर भारतात कोणत्याही राज्यात येऊ देणार नाही, असा इशारा सिंग यांनी दिला आहे. सिंग यांच्याकडून विरोध करण्यासाठी ठिकठिकाणी बैठकाही घेतल्या जात आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.