ठाकरे सरकारला धक्का : महाविकास आघाडीची तब्बल वीस मते फुटली

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा महाविकास आघाडीला पुन्हा चकवा
ठाकरे सरकारला धक्का : महाविकास आघाडीची तब्बल वीस मते फुटली
Devendra Fadnavis-Uddhav ThackeraySarkarnama

मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीचा पुन्हा धुव्वा उडवला आहे. राज्यसभा निवडणुकीपेक्षा आणखी दहा मते जास्त मिळवून भाजपच्या पाचही उमेदवारांनी बेगमी केली. भाजपचे 113 आमदारांचे संख्याबळ असताना 133 मते मिळवून महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मते आपल्याकडे वळवली.

Devendra Fadnavis-Uddhav Thackeray
खडसे, अहिर, राम शिंदे, खापरे, भारतीय यांचा विजयाचा गुलाल...

विधान परिषदेच्या आज झालेल्या मतमोजणीत काॅंग्रेसला सर्वात मोठा धक्का बसला. राम शिंदे (Ram Shinde) आणि श्रीकांत भारतीय (Shrikant Bhartiy) यांना भाजपने पहिल्या पसंतीची 30 मते दिली. भाजपचे पाचवे उमेदवार प्रसाद लाड (Prasad Lad) यांना 17 मते पहिल्या पसंतीची मिळाली. याशिवाय प्रवीण दरेकर यांना 29, उमा खापरे यांना 27 अशी पहिल्या पसंतीची मते मिळाली. राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे चारही उमेदवार प्रत्येकी 26 मते मिळवून विजयी झाले. तरी मते फुटल्याचे शल्य या पक्षांना झेलावे लागणार आहे.

शिवसेनेकडे अपक्षांसह पहिल्या पसंतीची सुमारे 63 मते असताना आणि काॅंग्रेसकडे 44 असताना काॅंग्रेसच्या दोन्ही उमेदवारांना पहिल्या पसंतीची कोट्याइतकी मते मिळू शकली नाही. ही बाब या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक बाब ठरली आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे उमेदवार रामराजे यांना 29 आणि एकनाथ खडसे यांना 28 मते पहिल्या मिळाली. त्यामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसने आपले उमेदवार सहज निवडून आणले. शिवेसनेचे सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांना कोट्याइतकी म्हणजे प्रत्येकी 26 मते मिळाली. त्यामुळे ते देखील विजयी झाले. पण शिवसेनेच्या उमेदवारांना या पेक्षा जास्त मतांनी विजय मिळवणे अपेक्षित होते. काॅंग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना 22 व भाई जगताप यांना 19 पहिल्या पसंतीची मते मिळाली. याचा अर्थ काॅंग्रेसकडे 44 मते असतानाही तीन मते फुटल्याचे दिसून येत आहे.

Devendra Fadnavis-Uddhav Thackeray
Video: एक देवेंद्र फडणवीस हे 35 मतांच्या इतके किंमतवान; प्रसाद लाड

राज्यसभा निवडणुकीत भाजपला 123 मते मिळाली होती. ती विधान परिषदेत वाढून 133 झाली. भाजपची सभागृहातील अपक्षांसह 113 आमदार आहेत. त्यापेक्षा वीस मते अधिक मते मिळवून भाजपचे पाचही उमेदवार निवडून आले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला धक्का दिल्याची प्रतिक्रिया भाजपच्या गोटातून व्यक्त करण्यात आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in