Mumbai : तुम्ही सांगा 1 कोटी ही मोठी रक्कम आहे का?

भारतीय जनता पक्षासमोर BJP शरण येणे Surrender म्हणजे क्लिनचिट Clean Chit होय. संजय राऊतांनाही Sanjay Raut त्यांनी तुम्ही शरण या असे सांगितले आहे. पण, आम्ही ऐकलेले नाही.
Sunil Raut
Sunil Raut sarkarnama

मुंबई : कुठल्याही परिस्थितीत संजय राऊतांना अटकवायचे या उद्दशाने ईडी काम करत आहे. आपल्या देशात दीड कोटी ही रक्कम फार मोठी नाही. आमचे ४० आमदार असेच गेलेले नाहीत. तर त्यांना खोट्या सीबीआय, ईडीच्या नोटीसा पाठवून दबाव तंत्र तयार केले आहे. भाजपला प्रादेशिक पक्ष ठेवायचे नाहीत. त्याची सुरवात त्यांनी शिवसेनेपासून केली आहे. भाजपमध्ये हिंमत असेल तर त्यांनी पत्राचाळीतील कॉन्ट्रक्टरची चौकशी लावावी, असे आव्हान संजय राऊतांचे बंधू सुनील राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.

सुनील राऊत म्हणाले, संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत या ईडीसमोर सर्वकाही सत्य सांगणार आहेत. मुळात ईडी कोणाच्यातरी दबावाखाली काम करत आहे. आम्ही जी जमीन घेतली आहे, ती रेडीरेकनरपेक्षा जास्त भावाने घेतली आहे. कोणताही रोखीने व्यवहार झालेला नाही. परंतू जबरदस्तीने ऑफिसमध्ये आणून आठ, आठ तास बसवून त्यांना भिती दाखवून त्यांच्याकडून आम्ही कॅश घेतली हे लिहून घेऊन संजय राऊतांना अटकवायच्या उद्देशाने ईडी काम करत आहे.

Sunil Raut
Raosaheb Danve : संजय राऊत तोंडाने वाया गेले ; ईडी विरोधात कायद्याने लढलं पाहिजे..

आपल्या देशात दीड कोटी रूपये ही मोठी रक्कम नाही. या देशात विजय मल्ल्या, निरज मोदी, सारखे अनेक लोक आहेत. जे भाजपचे विरोधक होते. प्रताप सरनाईक, यशवंत जाधव, गुलाबराव, नारायण राणे असतील, या लोकांनाही ईडीच्या नोटीस आल्या होत्या. मात्र, ते भाजपमध्ये गेले की ते वॉशिंग मशीनमध्ये जातात व क्लिन होऊन बाहेर येतात.

Sunil Raut
उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या प्रवक्त्यांना कोणता कानमंत्र दिला?

भारतीय जनता पक्षासेमर शरण येणे म्हणजे क्लिनचिट होय. संजय राऊतांनाही त्यांनी तुम्ही शरण या असे सांगितले आहे. पण, आम्ही ऐकलेले नाही. संजय राऊतांवर दबाव होता. ज्यांनी आयुष्याची ३० ते ३२ वर्षे बाळासाहेब ठाकरेंसोबत काम केले. ते कोणासमोर शरण जाणार नाहीत. गनिमी काव्याने सर्वांना अटकवण्याचे काम सुरू झाले आहे.

Sunil Raut
Shivsena News: `ईडी` चौकशीच्या नावाखाली देशात लोकशाहीचा खून!

आमचे ४० आमदार असेच गेलेले नाहीत. खोट्या सीबीआय, ईडीच्या नोटीसा पाठवून दबावतंत्र तयार केले आहे. मुळात भाजपला प्रादेशिक पक्षच ठेवायचे नाहीत. त्याची सुरवात त्यांनी शिवसेनेपासून केली आहे. पण, त्यांना कळत नाही की शिवसेना आमदारांच्यावर चालत नाही. तर शिवसैनिकांवर चालते. शिवसेना आजही मजबूत असून तिला कोणताही धोका नाही.

Sunil Raut
पृथ्वीराज चव्हाण म्हणतात, चुकीच्या घटनांचे घडय़ाळ आता उलट फिरवणार आहे का?

लवकरच पुन्हा मुख्यमंत्री पदी उद्धव ठाकरे बसतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरेंनी वर्षा निवास सोडले, संजय राऊतांना अटक केली या घटनांतून शिवसेनेविषयी सहानुभूती तयार झाली आहे. मुळात किरीट सोमय्या, मोहित कंबोज सारखी अमराठी माणसे सांगतात कोण भ्रष्ट आहेत. मुळात जे स्वतः भ्रष्ट आहेत. हिंमत असेल तर भाजपने पत्राचाळीतील नऊ ठेकेदारांची चौकशी लावावी.

Sunil Raut
मी निरव मोदीसारखा पळून गेलो नव्हतो : छगन भुजबळ

कारण त्यात मोहित कंबोजचा समावेश आहे. मोनार्क बिल्डर्स आहे. भाजप ही चौकशी करणार नाही कारण ते त्यांचे कार्यकर्ते आहेत. मुळात ५० लाख, एक कोटीच्या खोट्या एंट्री दाखूवून संजय राऊतांवर दबाव टाकून त्यांना अडविण्याचा प्रयत्न चालू आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. आम्ही पत्राचाळीतील नऊ ठेकेदारांची चौकशीची मागणी करणार असल्याचे श्री. राऊत यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com