भाजप-शिवसेनेने पैशाच्या जोरावर निवडणूक जिंकली : राष्ट्रवादीचा गंभीर आरोप

पराभव राष्ट्रवादी काँग्रेसला मान्य असून या पराभवाबाबत नक्कीच चिंतन करून पुन्हा नव्या जोमाने कामाला लागू
bjp-ncp-shivsena
bjp-ncp-shivsenaSarkarnama

शहापूर (जि. ठाणे) : शिवसेना (shivsena) आणि भारतीय जनता पक्ष (bjp) या दोन्ही पक्षांनी केवळ पैशाच्या जोरावर जनतेची फसवणूक करत शहापूर नगरपंचायत निवडणूक जिंकली, असा घणाघाती आणि तितकाचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे (ncp) करण्यात आला आहे. (BJP-Shiv Sena wins Shahapur Nagar Panchayat elections on strength of money : NCP)

दरम्यान, शहापूर नगरपंचायत निवडणुकीत झालेला पराभव राष्ट्रवादी काँग्रेसला मान्य असून या पराभवाबाबत नक्कीच चिंतन करून पुन्हा नव्या जोमाने कामाला लागू, असे ठाणे जिल्ह्याचे (ग्रामीण) सामाजिक न्याय, राष्ट्रवादी काँग्रेसचे अविनाश थोरात यांनी स्पष्ट केले.

bjp-ncp-shivsena
शिवसेना गुपचूप काही करत नाही; सर्वकाही खुलेआम करते : खडसेंना पाटलांचे उत्तर

थोरात म्हणाले की, शहापूर नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेना १०, तर भारतीय जनता पक्ष ७ जागांवर विजय झाला आहे. पण, त्यांचा हा विजय लोकशाही मूल्यांची पायमल्ली करून प्रचंड धनशक्तीच्या जोरावर मिळवलेला फसवा विजय आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे मत आहे. ही निवडणूक कुठल्याही सामाजिक अथवा विकासात्मक विषयांवर लढवली गेलेली नाही.

bjp-ncp-shivsena
सचिन वाझेने घेतली माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचीच झाडाझडती!

शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी केवळ पैशांच्या जोरावर जनतेची फसवणूक करून ही नगरपंचायतीची निवडणूक जिंकली आहे. विशेष करून भाजपने पैशाच्या जोरावर निवडणुका लढण्याचा घातलेला पायंडा लोकशाहीला घातक आहे. तो संविधानाचा अपमान करणारा आहे. सर्वच पक्षातील अनेक प्रामाणिक, होतकरू, निष्ठावान कार्यकर्त्यांची इतका पैसा खर्च करण्याची ऐपत नसल्याने निवडणुका लढण्याबाबत निराशा उत्पन्न करणारा आहे, असाही हल्लाबोल अविनाश थोरात यांनी या वेळी केला.

शहापूरमध्ये शिवसेना नगराध्यक्षपदी कोणाला बसवणार?

दरम्यान, शहापूर नगरपंचायतीच्या निवडणूक निकालानंतर बहुमत मिळालेल्या शिवसेनेतून आता नगराध्यक्षपदी कोण विराजमान होणार, याचे आखाडे बांधले जाऊ लागले आहेत. शिवसेनेचे १० नगरसेवक निवडून आले असले तरी यामध्ये सहा महिला सदस्यांचा समावेश आहे. मागील पंचवार्षिकमध्ये शहापूरचे नगराध्यपद महिलांसाठी आरक्षित झाले होते. यंदा आरक्षणात बदल झाला तरी संख्याबळानुसार शिवसेना यावेळीही महिलांनाच नगराध्यक्षपदी संधी देणार का, याबाबत चर्चांना उधाण आले आहे.

शहापूर नगरपंचायत निवडणुकीत भाजपला जोरदार टक्कर देत शिवसेनेने सत्ता राखली आहे. १७ प्रभागांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे १०, तर भाजपचे ७ सदस्य निवडून आले, तर काँग्रेस, राष्ट्रवादीला खातेही उघडता आले नाही. शिवसेनेचे १० सदस्य निवडून आले असून, यामध्ये महिलांची संख्या सर्वाधिक आहे. भाजपकडूनही सातपैकी तीन महिला सदस्या विजयी झाल्या आहेत.

मुरबाडमध्ये १७ पैकी १० महिला नगरसेविका

मुरबाड : मुरबाड नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपने १० जागा जिंकत बहुमत मिळविले. शिवसनेचे पाच आणि दोन अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. नगरपंचायतीमधील १७ पैकी ९ जागा महिलांसाठी आरक्षित होत्या. परंतु सर्व पक्ष मिळून नगरपंचायतीत महिलांची सदस्य संख्या १० झाली आहे. भाजपच्या १० पैकी ६ जागांवर महिला विजयी झाल्या आहेत; तर शिवसेनेकडून दोन आणि अपक्ष दोन महिला निवडून आल्या आहेत. मुरबाडमध्ये सर्वसाधारण असलेल्या प्रभाग ८ मधून ऊर्मिला ठाकरे या माजी नगरसेवक विलास खडकबाण या पुरुष उमेदवाराचा पराभव करून विजयी झाल्या. त्यामुळे महिला नगरसेवकांच्या संख्येत एकने वाढ झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com