Mumbai News : ठाकरेंना रोखण्यासाठी भाजप-शिवसेनेचा नवा प्लॅन; देणार जशास तसे उत्तर

Ashish Shelar News : आदित्य ठाकरेंनी मुंबईत निष्ठा यात्रा काढली होती, तर महाराष्ट्रात 'शिव संवाद' यात्रा.
Uddhav Thackeray, Devendra Fadnavis, Eknath Shinde News
Uddhav Thackeray, Devendra Fadnavis, Eknath Shinde NewsSarkarnama

Shiv Sena and BJP News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेनेत (Shivsena) मोठी फुट पडली आहे. पक्ष संघटना सावरण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यांनी राज्यभरामध्ये अनेक यात्रा काढल्या आहेत. ठाकरे गटाच्या या रणनितीला तोंड देण्यासाठी भाजप-शिवसेनेच्या वतीनेही यात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे.

आदित्य ठाकरेंनी मुंबईत निष्ठा यात्रा काढली होती, तर महाराष्ट्रात 'शिव संवाद' यात्रा. त्याचबरोबर ठाकरे गटाची 'महाप्रबोधन' यात्रा महाराष्ट्रभर सुरू आहे. त्यातच आता ठाकरेंनी आणखी एका यात्रा सुरू केली आहे. ती म्हणजे शिवगर्जना यात्रा. ठाकरे गटाकडून काढला जात असलेल्या यात्रेविरोधात भाजप-शिवसेनेने नवीन रणनीती आखली आहे.

Uddhav Thackeray, Devendra Fadnavis, Eknath Shinde News
Kapil Sibal News : केंद्र सरकारच्या विरोधात कपिल सिब्बल मैदानात; केली मोठी घोषणा

ठाकरे गटाने जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी राजकीय यात्रांचा मार्ग अवलंबला आहे. आदित्य ठाकरेंनी मुंबईतील बंडखोर आमदारांच्या विरोधात निष्ठा यात्रा काढली होती. तर मुंबई बाहेरील बंडखोर आमदारांविरोधात 'शिव संवाद' यात्रा काढली होती. आदित्य ठाकरेंच्या या यात्रेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता.

उद्धव ठाकरे विरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशी लढाई सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. ठाकरे गटाने तालुका पातळीवर पोहोचण्यासाठी शिवगर्जना यात्रा सुरू केलेली आहे. असे असतनाच आता भाजप (BJP)-शिवसेनेने एका यात्रेची घोषणा केली आहे. भाजप-शिवसेना 'आशीर्वाद' यात्रा काढून ठाकरेंना टक्कर देणार आहे.

भाजप-शिवसेनेच्या आशीर्वाद यात्रेची घोषणा भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आमदार आशीष शेलार यांनी केली आहे. भाजप-शिवसेनेची आशीर्वाद यात्रा उद्या (5 मार्च) पासून सुरु होणार आहे. ही यात्रा लोकसभा मतदारसंघातून काढण्यात येणार आहे. भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे, याच अनुषंगाने मुंबईतील सहा लोकसभा क्षेत्रात आशीर्वाद यात्रा सुरू होत आहे. दीड दोन तासांचा प्रवास करून प्रत्येक लोकसभा मतदारसंघात एका प्रसिद्ध मंदिरात दर्शन घेऊन यात्रा पुढे जाणार आहे. अशा सहा यात्रा काढल्या जाणार, असल्याचे आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी सांगितले.

Uddhav Thackeray, Devendra Fadnavis, Eknath Shinde News
Old Pension Scheme : जुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचारी आक्रमक; कोल्हापुरात पाटलांनी काढला धडकी भरवणारा मोर्चा

5 मार्च ते 9 मार्च आणि 11 मार्च या तीन दिवस प्रत्येकी दोन लोकसभा क्षेत्रात यात्रा काढली जाणार आहे. त्यानंतर 14 मार्चला दादर येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित 'जाणता राजा' महानाट्य होणार, असल्याचीही माहिती शेलार यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com