याद राखा, घोडामैदान दूर नाही ; सदाभाऊ खोतांचा ठाकरे सरकारला इशारा

महाविकास आघाडी सरकारला साधुसंतांच्या मोठेपणाची जाणीवच राहिलेली नाही,''अशा शब्दात खोतांनी ठाकरे सरकारला सुनावलं.
Sadabhau Khot, Uddhav Thackeray
Sadabhau Khot, Uddhav Thackeraysarkarnama

मुंबई : कीर्तन आणि प्रबोधनाच्या माध्यमातून समाजाला जागृत करण्याचं काम करणाऱ्या हिंगोली जिल्ह्यातील ह.भ.प.मस्के महाराज यांच्यावर नुकताच हल्ला झाला. त्यावर भाजपचे नेते, माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Thackeray government) निशाणा साधला आहे. खोत यांनी सोशल मीडियावर ठाकरे सरकारच्या कारभारावर टीकास्त्र सोडलं आहे.

''पुरोगामी महाराष्ट्रात मात्र अशा घटना का घडत आहेत याचा अंतर्मुख होऊन विचार करायला हवा. आज अखेर कुणाही वारकऱ्याच्या किंवा कीर्तनकाराच्या अंगावर हात उचलल्याचा आम्ही पाहिला नाही.पण महाविकास आघाडी सरकारच्या काळात हे कृत्य घडल ते दुर्दैवी आहे,'' असे सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.

''महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर या प्रवृत्तीला खतपाणी घातले गेले. हे जर असेच चालू राहिले तर या महाराष्ट्रातला वारकरी सांप्रदाय हा महा आघाडी सरकारला मातीमध्ये घातल्याशिवाय राहणार नाही. खरंतर अश्या घटनांना खतपाणी घालणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला साधुसंतांच्या मोठेपणाची जाणीवच राहिलेली नाही,''अशा शब्दात खोतांनी ठाकरे सरकारला सुनावलं.

Sadabhau Khot, Uddhav Thackeray
रवी राणांचा पालकमंत्री यशोमती ठाकुरांवर मोठा आरोप ; म्हणाले..

''संतांचा आदर करणारी ही भूमी आहे, महाराष्ट्र संतांनी घडवलेला आहे, यापुढे जर अशी घटना घडली तर याद राखा. घोडामैदान दुर नाही. महाराष्ट्रातला वारकरी भविष्यात तुमची थडगी बांधल्या शिवाय राहणार नाही,'' असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.

आपल्या फेसबूक पोस्टमध्ये सदाभाऊ म्हणतात..

महाराष्ट्राच्या संत परंपरेला गालबोट लावणारी एक घटना हिंगोली जिल्ह्यामध्ये कळमनुरी तालुक्यात घडली. कीर्तनाच्या आणि प्रबोधनाच्या माध्यमातून समाजाला जागृत करण्याचं काम करणाऱ्या हिंगोली जिल्ह्यातील ह. भ. प. मस्के महाराजांच्या थोबाडीत मारली गेले. हि महाराष्ट्राच्या परंपरेला शोभा देणारी घटना नाही. समाजाला जागं करणाऱ्या अनेक महान मानवांना सुळावर चढवण्याची परंपरा नवी नाही.

बुद्ध, भगवान महावीर यांना टाकीचे घाव सोसावे लागले. तरीही ते अमर आहेत. पुरोगामी महाराष्ट्रात मात्र अशा घटना का घडत आहेत याचा अंतर्मुख होऊन विचार करायला हवा.आज अखेर कुणाही वारकऱ्याच्या किंवा कीर्तनकाराच्या अंगावर हात उचलल्याचा आम्ही पाहिला नाही. पण महाविकास आघाडी सरकारच्या काळात हे कृत्य घडल ते दुर्दैवी आहे. आम्ही म्हणतोय तसंच बोलायचं, आम्ही सांगू तसंच वागायचं हा या संप्रदायावर आलेला मोठा घाला आहे. अशाप्रकारे कीर्तनकारांना अपमानित करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही.

विचारांची लढाई ही विचारांनीच लढायला हवी.राजकारणाच्या आखाड्यात कटकारस्थान जरूर करू या, डाव-प्रतिडाव जरूर खेळुयात.पण त्याचा बळी सामान्य वारकरी का ? या घटनेनं माझ्या मनाला सहस्त्र इंगळ्यांनी दंश केला. लोकशाहीने आम्हाला विचार स्वातंत्र्य दिलं. जे तुम्हाला अन्यायकारक वाटेल त्याच्यावरती आसूड ओढा. म्हणुनचं त्याच्यावर होणारे अन्याय हल्ले आम्ही कदापि खपवून घेणार नाही.पालघरला चार साधुसंतांना ठार मारण्याची घटना, त्यापाठोपाठ ह.भ.प. मस्के महाराज यांना थोबाडीत मारल्याची घटना हे सगळ सहन न होणारे आहे.

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर या प्रवृत्तीला खतपाणी घातले गेले. हे जर असेच चालू राहिले तर या महाराष्ट्रातला वारकरी सांप्रदाय हा महा आघाडी सरकारला मातीमध्ये घातल्याशिवाय राहणार नाही. खरंतर अश्या घटनांना खतपाणी घालणाऱ्या महा विकास आघाडी सरकारला साधुसंतांच्या मोठेपणाची जाणीवच राहिलेली नाही. पण हे लक्षात घ्या संतांचा आदर करणारी ही भूमी आहे,महाराष्ट्र संतांनी घडवलेला आहे, यापुढे जर अशी घटना घडली तर याद राखा.घोडामैदान दूर नाही.महाराष्ट्रातला वारकरी भविष्यात तुमची थडगी बांधल्या शिवाय राहणार नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com