BJP-MNS alliance : देशात, राज्यात आमचीच सत्ता ; राज ठाकरेंची नदी समुद्रामध्ये आली तर स्वागत होईल..

Narayan Rane : मी संकुचित नाही, असे राणे म्हणाले...
Narayan Rane & Raj Thackeray Latest News
Narayan Rane & Raj Thackeray Latest NewsSarkarnama

मुंबई : ज्या समविचाराने महाराष्ट्र पुढे जाईल असे समविचार मराठी माणसाच्या हितासाठी एकत्रित येत असतील तर त्याच स्वागत केले पाहिजे. मी संकुचित नाही. जर असं घडत असेल तर भारतीय जनता पक्षाचं राज्यात देशात सरकार आहे. राष्ट्रीय पक्ष आहे. समुद्रामध्ये जर राज साहेबांची (Raj Thackeray) नदी आली तर त्यांच स्वागत होईल, अस वक्तव्य भाजप (BJP) नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी व्यक्त केलं आहे. त्यांनी आज (ता.३१ ऑगस्ट) गणरायाच्या आगमनानिमित्त 'सरकारनामा'शी खास संवाद साधला.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि भाजपच्या युतीबाबत चर्चा रंगत आहेत. या पार्श्वभूमीवर राणे यांनी आपलं मत व्यक्त केल आहे. याबरोबरच त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षाच्या कामगिरीवर सुद्धा कठोर शब्दाच टीका केली आहे. (Narayan Rane & Raj Thackeray Latest News)

Narayan Rane & Raj Thackeray Latest News
मी आणि मुख्यमंत्री शिंदे निष्ठावान शिवसैनिक, त्यांनी दसरा मेळावा घ्यावा...

राणे म्हणाले की, ज्या समविचाराने महाराष्ट्र पुढे जाईल असे समविचार मराठी माणसाच्या हितासाठी एकत्रित येत असतील तर स्वागत केले पाहिजे. मी संकुचित नाही. जर असं घडत असेल तर भारतीय जनता पक्षाचं राज्यात, देशात सरकार आहे. तो राष्ट्रीय पक्ष आहे. समुद्रामध्ये जर राज साहेबांची त्यांची नदी आली तर स्वागत होईल. राज ठाकरे हे सुज्ञ असून ते विचार करतील आणि प्रवाहाच येतील आम्ही त्यांचं स्वागत करू,असे सूचक वक्तव्य यांनी केलं आहे. यामुळे खरच भाजप मनसे युती होणार का याबाबत चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे.

दरम्यान राणे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला ते म्हणाले की, गेल्या दीड वर्षात राज्यात कायदा सुव्यवस्था नव्हता याबरोबर कुठलाही विकास झाला नसून कोणत्याही क्षेत्रात ते काम करू शकले नाही. याचबरोबरच राज्यात सुशांत सिंग सारख्या कलावंताची हत्या झाली. दिशा सालीयनची अत्याचार करून हत्या झाली त्यांच्यावर अन्याय झाला आहे. यामुळे आम्ही वारंवार हा प्रश्न उपस्थित करत आहे. त्यांच्या हत्येपाठीमागे तत्कालीन सरकारमधील काही लोकांचा हात असल्याचा आरोपही राणेंनी केला.

Narayan Rane & Raj Thackeray Latest News
भाजप-मनसे युतीबाबत अहिरांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात रंगली चर्चा

उद्धव ठाकरेंच्या कामाचा विश्लेषण कराव असं काहीच नाही राज्याचे गेल्या अडीच वर्षात उत्पन्न किंवा जी.डी.पी वाढला नाही. शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही. मराठी माणसांना नोकऱ्या मिळाल्या नाही. ठाकरे यांच्या सरकार निष्क्रिय सरकार होत. मी महाराष्ट्राच्या इतिहासात असं सरकार कधीच बघितलं नव्हतं,असा टोला देखील त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. तर मुख्यमंत्री म्हणून सांगायचं झाल्यास, असे मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाले नाही आणि परत कधी मिळूही नये. ते तीन तासापेक्षा जास्त वेळ ते मंत्रालयात ना कॅबिनेट न सभागृहात दिसत होते. असला मुख्यमंत्री काय कामाचा त्यांनी आता गप्प बसावं बढाया मारू नये, अशा शब्दात राणे यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळावा घ्यावा का? या प्रश्नावर बोलताना राणे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळावा जरूर घ्यावा. महाराष्ट्राला दिशा कोणती देणार, कुठल्या दिशेला घेऊन जाणार हे त्यांनी महाराष्ट्राला सांगावं. त्यांनी मला निमंत्रण दिले तर मी त्यांच्या दसरा मेळाव्याला जाईल आणि जुना शिवसैनिक कसा असतो त्याचा प्रत्यय नवीन शिवसैनिकांना घडवून आणेल, असेही त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in