ओबीसी आरक्षणासाठी भाजप रस्त्यावर; ठाकरे सरकारचा केला धिक्कार...

भाजपच्या सत्ता काळात त्यावेळी देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत दादांच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले. पण हे आरक्षण तिघाडी सरकारला टिकविता आलेले नाही. त्याच पद्धतीने ओबीसी समाजावर हे सरकार ही अन्याय करत आहे.
ओबीसी आरक्षणासाठी भाजप रस्त्यावर; ठाकरे सरकारचा केला धिक्कार...
BJP on the road for OBC reservation; Condemnation of Thackeray government ...

सातारा : भारतीय जनता पार्टीचा विजय असो.., ठाकरे सरकारचा धिक्कार असो.., ओबीसींना न्याय मिळालाच पाहिजे, अशी घोषणाबाजी करत भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ओबीसींच्या राजकिय आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन केले. जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या आंदोलनात महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवण्यात आली. तसेच भाजप येणाऱ्या सर्व निवडणुकीत ओबीसींच्या जागेवर ओबीसीच उमेदवार देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. BJP on the road for OBC reservation; Condemnation of Thackeray government ...

ओबीसी आरक्षणात राज्य सरकारने दाखविलेल्या निष्काळजीपणाबद्दल निषेध व्यक्त करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्यावतीने आज साताऱ्यातील पोवईनाका येथे निषेध आंदोलन केले. जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. ठाकरे सरकारचा धिक्कार असो.., ओबीसींना न्याय मिळालाच पाहिजे, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, अशी घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी विक्रम पावसकर म्हणाले, ओबीसींना राजकिय आरक्षण डावलण्यात आले, या विरोधात भाजपने आंदोलन सुरू केले आहे. महाविकास आघाडी सरकारने ओबीसींच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर कोर्टात वकिलही दिला नाही. आरक्षण गेल्याने एकीकडे हे तीनही पक्ष हळहळत असल्याचे दाखवत आहेत, पण प्रत्यक्ष त्यांना उकळ्या फुटत आहेत. ओबीसींचे आरक्षण गेल्यास त्यांना फायद्याचे ठरणार आहे. पण ओबीसी समाजाच्या पाठीशी भारतीय जनता पक्ष ठामपणे उभा राहणार आहे.

जोपर्यंत राजकिय आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत भारतीय जनता पक्ष आंदोलन करत राहणार आहे.  मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात काही कागदपत्रे सादर करायची होती, ती पण त्यांनी देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे मराठा समाजाचे आरक्षण गेले. भाजपच्या सत्ता काळात त्यावेळी देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत दादांच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले.

पण हे आरक्षण तिघाडी सरकारला टिकविता आलेले नाही. त्याच पद्धतीने ओबीसी समाजावर हे सरकार ही अन्याय करत आहे. ओबीसींच्या हक्काचे राजकिय आरक्षण काढून घेतले जात आहे. येणाऱ्या निवडणूकीत भाजप ओबीसींच्या जागावर ओबीसींचेच उमेदवार देणार आहे. तसेच सर्व घटकांना योग्य न्याय देणार असल्याचे पावसकर यांनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.