Shiv Sena Vs BJP : ‘शिवसेना, धनुष्यबाणासाठी दोन हजार कोटींचा सौदा’ : राऊतांच्या दाव्यावर भाजपने दिले हे उत्तर...

शिवसेनेचं नाव आणि चिन्ह विकत घेतलं गेलयं. हीच माहिती मला त्यांच्याच मित्रपरिवारातील बिल्डरांनी दिली आहे.
Sanjay Raut-Keshav Upadhye
Sanjay Raut-Keshav Upadhye Sarkarnama

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना (Shivsena) आणि धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला बहाल केला आहे. त्यानंतर ठाकरे गटाकडून आयोगावर हल्लाबोल केला जात आहे. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज तर शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हासाठी दोन हजार कोटी रुपयांचा सौदा झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यावर भारतीय जनता पक्षाकडून (BJP) उत्तर देण्यात आले आहे. (BJP responded to Sanjay Raut's allegations)

भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी संजय राऊत यांना काही सवाल करत प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, किती घसरणार आहात संजय राऊत? गेल्या दोन अडीच वर्ष नुसतीच बेछूट आरोपांची राळ उडवली. एक आरोप ठोस सिध्द करू शकला नाहीत. नैराश्यातून माणूस बेताल बडबड करून चेष्टेचा विषय होतो; म्हणून इतकंही हसं करून घेऊ नका. संघर्ष करणारे अण्णाभाऊ साठे कुठे आणि आरामात जगणारे तुमचे नेते कुठे? असा खडा सवाल उपाध्ये यांनी खासदार राऊतांना केला आहे.

Sanjay Raut-Keshav Upadhye
Ambegaon News : आंबेगावात आता विकासासाठी डबल इंजिन : वळसे पाटलांच्या कोटीला आढळरावांची हसून दाद

शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या अनेक नेत्यांकडून निवडणूक आयोगाच्या निर्णयावर टीका झाली आहे. संजय राऊत यांनीच आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहोत, असे स्पष्ट केले आहे. खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या निर्णयावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप नेत्यांविरोधात आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. दुसरीकडे संजय राऊत यांनी आज दोन हजार कोटींचा सौदा झाल्याचे सांगून खळबळ उडवून दिली आहे.

Sanjay Raut-Keshav Upadhye
Shah On Patil : ‘ये हर्षवर्धन मेरा सर खा जाता है हमेशा’ : ‘इथेनॉल’ फायनान्ससाठी लढणाऱ्या पाटलांचा शहांकडून भाषणात उल्लेख

काय म्हणाले संजय राऊत?

"माझी खात्रीची माहिती आहे...चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आतापर्यंत 2000 कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत... हा प्राथमिक आकडा आहे आणि 100 टक्के सत्य आहे... बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील.. देशाच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते.." असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे. शिवसेनेचं नाव आणि चिन्ह विकत घेतलं गेलयं हा न्याय नाहीये. हा न्याय विकत घेतला गेलाय. ही डील आहे. मी माझ्या मतावर ठाम आहे, हा विकत घेतलेलाच निर्णय़ आहे. असंही राऊतांनी म्हटलं आहे. हीच माहिती मला त्यांच्याच मित्रपरिवारातील बिल्डरांनी दिली आहे, असा दावाही संजय राऊत यांनी केला आहे..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in